WTC Final : 7 जूनपासून म्हणजेच बुधवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना रंगणार असून भारत ( Team India ) विरूद्ध ऑस्ट्रेलिया आमने - सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टेस्ट क्रिकेटबाबत एक मोठं विधान केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) सामना रंगण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सवर एक कार्यक्रम घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार स्पोर्ट्सवर घेतलेल्या या कार्यक्रमामध्ये हर्षा भोगले यांनी रोहित शर्माला ( Rohit Sharma ) गेल्या काही वर्षांतील टेस्टमधील ठळक घटनांबद्दल प्रश्न केला. 


या कार्यक्रमात बोलातना रोहितने सांगितले की, कोरोनामध्ये सर्वजण घरी होते आणि कोणाकडून काहीही अपेक्षित नव्हतं. मात्र कधीतरी अशी परिस्थिती समोर येते त्यातून बाहेर पडावं लागतं. टीम इंडियाची ( Team India ) ऑस्ट्रेलियामधील ही टीमची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली होती.


रोहितच्या ( Rohit Sharma ) म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियातील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खेळाडूंनी कमबॅक केलं. यावेळी खेळाडूंनी त्यांची खरी ताकद दाखवून दिली. त्यावेळी बरेच खेळाडू जखमी झाले आणि मी स्वतः पहिल्या दोन टेस्ट सामने खेळलो नाही. आमच्यासाठी तो एक कठीण काळ होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर आम्ही पुन्हा आघाडीवर आलो पण त्यामागे आमचं ग्राउंड वर्क होते. अनेक युवा खेळाडू आले आणि याठिकाणी शिकले. आम्ही भारताबाहेर खेळलेले ते सर्वोत्तम क्रिकेट होतं. नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सिरीज खेळली, ती देखील रोमांचक होती, असंही रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला.


रोहित शर्माच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह


गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माची ( Rohit Sharma ) कामगिरी काही फारशी चांगली झालेली दिसत नाहीये. त्यामुळे आता त्याच्या कर्णधारपदावरूनही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रोहितचा ( Rohit Sharma ) स्वत:च्या खराब फॉर्म पाहता WTC च्या फायनल सामन्यामध्ये त्याच्या खेळावर आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार?


बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) कर्णधारपदाबाबत मोठं अपडेट दिलं आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या टेस्ट टीमसाठी कर्णधार शोधण्याची घाई नाहीये. रोहित शर्मा फीट आहे. WTC फायनलचा निकाल काहीही असला तरीही रोहितचं भारतासाठी टेस्ट टीमच्या कर्णधारपदी कायम असणार आहे.