Rohit Sharma ने अनुष्का शर्माला पाडलं खोट्यात; कोहली बद्दल `हे` काय बोलून बसला कर्णधार
अभिनेत्री अनुष्का शर्माने, आजारी असूनही विराटने उत्तम खेळी केल्याची पोस्ट केली. पण याबाबत सामना संपल्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma breaks silence on Virat Kohli sickness) मोठा खुलासा केला आहे.
Rohit Sharma on Virat Kohli sickness : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus 4th Test) यांच्यामध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर टेस्ट (Border Gavaskar Trophy) सिरीज टीम इंडियाने जिंकली. या सिरीजचा चौथा सामना ड्रॉ झाला. मात्र विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांना मात्र हा सामना फारच आवडला. या सामन्यात किंग कोहलीने जबरदस्त शतक झळकावत 186 रन्सची खेळी केली. दरम्यान त्याच्या पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने, आजारी असूनही विराटने उत्तम खेळी केल्याची पोस्ट केली. पण याबाबत सामना संपल्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma breaks silence on Virat Kohli sickness) मोठा खुलासा केला आहे.
अनुष्का शर्माची (Anushka Sharma) विराटसाठी पोस्ट
अहमदाबादच्या टेस्टमध्ये विराट कोहलीने चौथ्या दिवशी शतक झळकावलं. यानंतर अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की, आजारी असून देखील तू इतका चांगला खेळलास, तू मला नेहमीच प्रेरीत करतोस. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर विराट आजारी असल्याची एकच चर्चा रंगली
रोहित शर्माचं (Rohit Sharma) खळबळजनक वक्तव्य
दरम्यान प्रेस कॉन्फरन्समध्ये कर्णधार विराट कोहलीच्या तब्येतीबाबत रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानंतर रोहित म्हणाला, या सर्व अफवा होत्या...मला नाही वाटत की तो आजारी होता. तो थोडासा खोकत होता. त्याला काहीशी कफची समस्या होती. मला मला नाही वाटत, की त्याच्या तब्येत जास्तच खराब होती.
रोहित पुढे म्हणाला, विराट कोहली टीमसाठी जसं गेल्या काही वर्षांपासून खेळतोय, तसाच आताही खेळू इच्छितो. मुख्य म्हणजे, नेहमीच त्याला असा चांगला खेळ करण्याची इच्छा असते.
अक्षरनेही उपस्थित केले होते प्रश्न
सामन्यानंतर जेव्हा अक्षर पटेलला कोहलीच्या आजाराबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी पटेल म्हणाला, तो आजारी आहे याबद्दल मला माहिती नाही. ज्या पद्धतीने तो रन्ससाठी धावत होता, त्यावरून तरी तो आजारी वाटला नाही.
कोहलीने झळकावलं शतक
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे. तब्बल तीन वर्षांनी विराट कोहलीने शतक केलं आहे. विराट कोहलीचं कसोटी करिअरमधील हे 28 वं शतक आहे. यानिमित्ताने विराटने टी-20, वन-डे नंतर आता कसोटी मालिकेतील शतकांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे.