हैदराबाद : हैदराबादमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. सामना संपल्यानंतर जेव्हा कर्णधार रोहित शर्माला ट्रॉफी देण्यात आली तेव्हा त्याने एक मोठी गोष्ट केली. रोहितने केलेल्या या गोष्टीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होताना दिसतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिरीज जिंकल्यानंतर जेव्हा रोहितला ट्रॉफी दिली तेव्हा त्याने ती टीमतील सर्वात वरीष्ठ खेळाडू म्हणजेच दिनेश कार्तिकच्या हातात दिली.


धोनीच्या काळापासून कोणताही भारतीय कर्णधार टीममधील सर्वात तरुण किंवा नवीन खेळाडूला ट्रॉफी देतो. धोनीपाठोपाठ कोहली आणि रोहितनेही अशीच कामगिरी केली. पण यावेळी रोहितने थोडं वेगळं केलं आणि 37 वर्षीय दिनेश कार्तिककडे ट्रॉफी दिली. अशा पद्धतीने रोहितने टीम इंडियाची परंपरा मोडली आहे.



या मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये कार्तिक भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. दुसऱ्या T20 मध्ये त्याने शेवटच्या दोन बॉल्समध्ये 10 रन्स करून भारताला विजयाचा उंबरठा ओलांडून दिला.


टीम इंडियाचा विजय


ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) रोमहर्षक पद्धतीने जिंकलाय. 6 विकेट राखून टीम इंडियाने हा विजय मिळवलाय. या विजयानंतर टीम इंडियाने 9 वर्षानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध (austrailia) टी20 मालिका जिंकली. या विजयाचा खरा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला आहे.


9 वर्षांनंतर मालिकेवर बाजी


टीम इंडियाने (Team India) शेवटची टी20 मालिका 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियासमोर आज पुन्हा मायदेशात मालिका विजयाचा योग जुळुन आला होता. त्यानुसार टीम इंडियाने (Team India) 2-1 ने मालिका खिशात घातली. आणि 9 वर्षांचा दुष्काळ संपवला.