खेळाडूंनी शिकलं पाहिजे की....; विजयानंतर कर्णधार Rohit Sharma चं मोठं विधान
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 20 बॉल्समध्ये 43 रन्स करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
नागपूर : रोहित शर्माची झंझावाती खेळी आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. यासह भारतीय टीमने सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसला. यावेळी त्याने खेळाडूंचे जोरदार कौतुक केलं. तसंच तुम्ही अशा सामन्यांमध्ये कोणतीही रणनीती बनवू शकत नाही, असंही कर्णधार रोहितने सांगितलंय.
रोहित शर्मा काय म्हणाला?
सामना जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या खेळीबद्दल सांगितलं की, 'गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून मी असाच खेळतोय, त्यामुळे फारसा बदल झाला नाही, पण अशा सामन्यांमध्ये फारशी रणनीती बनवता येत नाही. परिस्थितीनुसार खेळावे लागतं."
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 20 बॉल्समध्ये 43 रन्स करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
या खेळाडूंचं केलं कौतुक
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ''आम्ही गोलंदाजी करत होतो तेव्हा परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर दव पडू लागलं. या परिस्थितीत खेळणं किती कठीण असतं, हे खेळाडूंनी यातून शिकावं अशी आमची इच्छा आहे. जसप्रीत बुमराहला कमबॅक करताना पाहून आनंद झाला. त्याने यावं आणि आनंद घ्यावा अशी इच्छा आहे."
भारताचा विजय
टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर (IND vs AUS 2ND T20) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाने हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 8 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.
कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 46 रन्सची नाबाद खेळी केली. तर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शेवटच्या 2 बॉलवर सिक्स आणि फोर मारत भारताला विजय मिळवून दिला.