Rohit Sharma : फलंदाजी करत असताना अचानक संतापला रोहित; ग्राऊंडमॅनला शिवीगाळ करताना व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर रोहित शर्माचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा गलिच्छ शिव्या देताना कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान चाहत्यांनी रोहितच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय.
Rohit Sharma : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये (IND vs AUS) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील शेवटचा आणि चौथा सामना अहमदाबादच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येतोय. या सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमचं वर्चस्व दिसून आलं. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 रन्सवर आटोपला. तर दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारत 36 नाबाद अशा स्थितीत आहे. मात्र दुसरा दिवस संपत असतानाच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फलंदाजीदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
सोशल मीडियावर रोहित शर्माचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा गलिच्छ शिव्या देताना कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान चाहत्यांनी रोहितच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय.
ग्राऊंटमॅनला हिटमॅनकडून शिवीगाळ
480 रन्सवर कांगारूंचा ऑलआऊट झाला. यानंतर टीम इंडियाने ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले. ही घटना 8.2 ओव्हरला घडली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने रोहित शर्माला बॉल टाकला आणि त्याने लगेच एक रन काढून घेतला. यावेळी ग्राऊंडमॅनमुळे रोहितला खेळण्यात अडचण येत होती. तेव्हा रोहितने तातडीने अंपायरला त्यांची तक्रार केली. यानंतर अंपायरनेही तातडीने अॅक्शन घेतली.
ऑस्ट्रेलिया टीम 480 रन्समध्ये ऑलआऊट
चौथ्या सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियन टीमचं वर्चस्व दिसून आलं. ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्या डावामध्ये 480 रन्स केले. कांगारूंच्या पहिल्या इंनिंगमध्ये उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन यांनी शतकी खेळी खेळली. ख्वाजा 180 तर ग्रीन 114 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतले. मुख्य म्हणजे या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 208 रन्सची पार्टनरशिप केली.
टीम इंडियाकडून स्पिनर रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक म्हणझेच 6 विकेट पटकावल्या. तर मोहम्मद शमीला 2 विकेट्स घेण्यात यश आलं आहे.