मुंबई : विंडीज विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्य़ा टी20 सामन्यात भारतीय टीम रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. लखनऊमध्ये हा पहिला आंतरराष्ट्रय सामना होत आहे. अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात भारत सिरीज जिंकण्यासाठी प्रयत्न करेल तर विंडिज सिरीज वाचवण्यासाठी प्रयत्न करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातामध्ये झालेला पहिला टी20 सामना 5 विकेटने भारताने जिंकला होता. 2016 मध्ये झालेल्या वर्ल्ड टी20 नंतर भारताने 32 टी20 सामने खेळले ज्यामध्ये भारताने 22 सामने जिंकले आहेत. एक सामना ड्रॉ झाला. वेस्ट इंडीजने 25 टी20 सामन्यामध्ये 9 सामने जिंकले आहेत तर 14 सामन्यात पराभाव स्विकारावा लागला आहे. 2 सामने ड्रॉ झाले आहेत. 


लखनऊमधलं हे तिसरं मैदान आहे तेथे आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. शिखर धवनला टी20 मध्ये 1000 रन पूर्ण करण्यासाठी 20 रनची गरज आहे. तर दुसरीकडे रोहित देखील विराटचा रेकॉर्ड मोडू शकतो. 11 रन बनवताच रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरणार आहे. रोहितने 85 टी20 सामन्यांमध्ये 2092 रन केले आहेत. विराट कोहलीच्या नावावर 2102 रन आहेत.