धर्मशाला : श्रीलंकेविरूद्धचा पहिला टी-20 सामना जिंकून रोहित शर्माने टीम इंडियाला सलग दहावा विजय मिळवून दिलाय. तर आज या सिरीजचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जर टीम इंडिया जिंकली तर सिरीज जिंकण्यासोबतच रोहित शर्मा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावे करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरूद्धचा पहिला टी-20 सामना जिंकून रोहितने घरच्या मैदानावर सर्वात जास्त सामने जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केलीये. त्याने आता पर्यंत भारतात 15 टी-20 सामने जिंकले आहेत. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे रोहितने आजचा सामना जिंकल्यास घरच्या मैदानावर 16 सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड तो करू शकतो.  


रोहित कर्णधार असताना न्यूझीलंडविरूद्ध 3 टी-20 सामने जिंकले. त्यानंतर वेस्टइंडिज विरूद्ध 3 वनडे आणि 3 टी-20 सामने जिंकून क्लिन स्विप दिला. त्यानंतर आता श्रीलंकेलाही पहिल्या सामन्यात मात दिली. अशा पद्धतीने रोहितने कर्णधार म्हणून सलग 10 सामने जिंकून दिलेत. आणि घरच्या मैदानावर एकूण 15 सामने जिंकलेत. मुख्य म्हणजे त्याने केवळ 16 सामन्यांमध्ये का कारनामा केला आहे. 


रोहितने घरच्या मैदानावर सर्वात जास्त टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकलंय. विराटने यामध्ये 13 टी-20 सामने जिंकले आहेत. तर धोनीने 10 सामने जिंकले आहेत.


दुसरीकडे टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहितने आतापर्यंत 292 चौकार मारले आहेत तर विराटच्या नावे 298 चौकार आहेत. आजच्या सामन्यात रोहितने 7 चौकार मारले तर तो कोहलीलाही मागे टाकणार आहे. शिवाय जर त्याने 8 चौकार मारले तर रोहित भारताकडून टी-20 इंटरनॅशनल क्रिकेट 300 चौकार लगवणारा पहिला फलंदाज ठरणार आहे.