₹ 700000000000 रुपयांची मालकीण, कोट्यावधींची उलाढाल... 'या' महिलेचं रतन टाटांसोबत जवळचं नातं, त्या आहेत तरी कोण?

Ratan Tata Family : टाटा हे कुटुंब कायमच चर्चेत असतं. पण रतन टाटा यांच्याशी अगदी जवळचे संबंध असलेल्या या महिलेचा कोट्यावधीचा व्यवसाय आहे. ही महिला कोण आहे त्यांचा कसला आहे व्यवसाय?

| Sep 29, 2024, 11:12 AM IST

Who is Rohiqa Cyrus Mistry: देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या टाटांचे यश रतन टाटांशिवाय अपूर्ण आहे. टाटासन्सला रतन टाटा यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.  रतन टाटा यांच्या व्यावसायिक संबंधांबद्दल अनेकांना माहिती आहे, परंतु त्यांचे खासगी आयुष्य मात्र सगळ्यांपासून दूर आहे. रतन टाटा यांचे अनेक जवळचे संबंध आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असेच एक नाव म्हणजे रोहिका सायरस मिस्त्री. ( Rohiqa Cyrus Mistry)

1/7

अरबोंची संपत्ती

रोहिका मिस्त्री टाटासन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांची पत्नी आहे. जून 2022 मध्ये एका कार अपघातात सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर रोहिका मिस्त्री फक्त जबाबदारीच नाही तर अरबोंची संपत्ती ठेवून गेले. या संपत्तीमुळे त्यांची ओळख देशातील गडगंज श्रीमंत महिलांमध्ये केली जात आहे.  

2/7

कोण आहे रोहिकी मिस्त्री

रोहिका मुस्लिम कुटुंबातील आहे. तिचे आजोबा एमसी छागला हे मोठे व्यक्तीमत्त्व आहे. तिचे आजोबा एम सी छागला हे न्यायशास्त्रज्ञ आणि माजी कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे वडील बॅरिस्टर इक्बाल छागला हे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आहेत. रोहिका आणि सायरस मिस्त्री यांचा विवाह 1992 मध्ये झाला होता. रोहिका स्वतः कॉर्पोरेट आयकॉन आहे. त्यांनी अनेक खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांचे संचालकपद भूषवले आहे.

3/7

किती अमीर आहे रोहिका मिस्त्री

 पतीच्या निधनानंतर वडिलोपार्जित मालमत्ता रोहिका मेस्त्री यांना मिळाली. फोर्ब्स बिलेनियर्स इंडेक्सनुसार 2023मध्ये त्यांची संपत्ती जवळपास 9.3 अरब डॉलरम्हणजे 7,72,03,71,75,000  रुपये होती.

4/7

देशातील दुसरी श्रीमंत महिला

 त्या देशातील दुसऱ्या अमिर महिला आहेत. पतीच्या निधनानंतर टाटासन्समध्ये 18.4 टक्क्यांचा भागही त्यांच्या नावे झाला. मिस्त्री कुटुंबाच साम्राज्य रिअल इस्टेटमध्ये पसरलं आहे. 

5/7

रतन टाटा यांच्यासोबत नातं

मिस्त्री कुटुंबाचे टाटा यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु टाटा आणि मिस्त्री यांच्यातील कौटुंबिक संबंधांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 

6/7

रतन टाटा यांचा भाऊ

सायरस मिस्त्री यांची बहीण अलु मिस्त्री हिचा विवाह रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी झाला होता. या नात्याने रतन टाटा यांच्याशी मिस्त्री कुटुंबीयांचे संबंध जोडले गेले. नोएल टाटा हे सायरस मिस्त्री यांचे मेहुणे होते, म्हणजेच नोएल टाटा यांचे सावत्र भाऊ रतन टाटा हे देखील त्यांच्या मेहुण्यासारखे होते.

7/7

सायरसची पत्नी कॉर्पोरेट आयकॉन

रोहिका छागला स्वतः कॉर्पोरेट आयकॉन आहेत आणि त्यांनी काही खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित कंपन्यांमध्ये संचालक पद भूषवले आहे. मिस्त्री कुटुंबाच्या साम्राज्यात प्रामुख्याने रिअल इस्टेट आणि टाटा समूहातील स्टेक आहेत. त्यांची आशिया खंडात आलिशान हॉटेल्स, स्टेडियम, राजवाडे आणि कारखाने आहेत. रोहिका छागला यांचे वडील बॅरिस्टर इक्बाल छागला आणि त्यांचे आजोबा एमसी छागला हे न्यायशास्त्रज्ञ आणि माजी कॅबिनेट मंत्री होते.