Rohit Sharma: दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माची वर्णी? ऋषभ पंतचं काय होणार?
Rohit Sharma DC New Captain: रोहित शर्माच्या कर्णधारपदासंदर्भात मार्क बाऊचरने मोठं विधान केलं. बाऊचरच्या कमेंटमुळे या मुद्दा पुन्हा एकदा पेटला. पण आता रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दिल्ली कॅपिटल्समध्ये जाणार का, असा सवाल केला जातोय?
Rohit Sharma DC New Captain: काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) चाहत्यांना मॅनेजमेंटने एक मोठा धक्का दिला. यावेळी मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माला ( Rohit Sharma ) बाजूला सारून हार्दिक पंड्याच्या हाती टीमची कमान सोपवली. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीमला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता. नुकतंच रोहित शर्माच्या कर्णधारपदासंदर्भात मार्क बाऊचरने मोठं विधान केलं. बाऊचरच्या कमेंटमुळे या मुद्दा पुन्हा एकदा पेटला. पण आता रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दिल्ली कॅपिटल्समध्ये जाणार का, असा सवाल केला जातोय?
आयपीएलची ट्रेड विंडो अजूनही ओपन
आता चाहत्यांना प्रश्न पडेल हे कसं शक्य आहे. मात्र आयपीएलची ट्रेड विंडो अजूनही खुली आहे, त्यामुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी वक्तव्य केलं होतं की, ऋषभ पंत संपूर्ण सिझनमध्ये कर्णधारपद भूषवू शकेल की नाही हे निश्चित नाही. अपघातानंतर पंत अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाहीये. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.
रोहित शर्मा बनणार दिल्लीचा कर्णधार
दिल्ली कॅपिटल्सने यापूर्वीही रोहित शर्माशी ( Rohit Sharma ) संपर्क साधला होता. मात्र तेव्हा रोहित शर्माने स्पष्ट नकार दिल्याचं समजलं होतं.दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा रोहित शर्माशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची शक्यता आहे. याचं कारण दिल्ली नवीन कर्णधाराच्या शोधात आहे.
आयपीएलची ट्रेड विंडो अजूनही खुली आहे आणि रोहित शर्माची ( Rohit Sharma ) इच्छा असल्यास तो दिल्ली मध्ये जाऊ शकतो. याशिवाय दिल्ली कॅपिटल्समध्ये रोहितची एन्ट्री झाल्यास कर्णधारपदाची धुराही रोहितच्या खांद्यावर दिली जाऊ शकते. आयपीएल सुरु होण्यापूर्वी एक महिन्याअगोदर ट्रेड विंडो सुरु असणार आहे.
रोहित चेन्नईकडून खेळणार असल्याच्याही समोर आलेल्या बातम्या
रोहित शर्माला ( Rohit Sharma ) मुंबईच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये सामील होऊ शकतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. महेंद्रसिंग धोनी चेन्नई टीमचं नेतृत्व करतोय. पण त्यानंतर या सर्व गोष्टी चेन्नई फ्रेंचयाझीने फेटाळून लावल्या होत्या. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी लिलावाच्या वेळी सांगितलं की, रोहितला आम्ही टीममध्ये घेण्याच्या मूडमध्ये नाही. या सर्व बातम्या अफवा आहेत.