Trending Video: शनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली. मात्र हिटमॅनच्या या एक्शनचा गुरु कोण होता याबाबत आता खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने T20 वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावला नाही. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 176 रन्स केले. यावेळी प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची टीम केवळ 169 रन्स करू शकली. भारताच्या फलंदाजीत विराट कोहलीने आपली ताकद दाखवली. तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्या यांनी त्यांच्या गोलंदाजीची जादू दाखवून दिली. 


'या' खेळाडूने रोहितला शिकवलं ट्रॉफी कशी उचलावी


टी-20 वर्ल्डकपचा फायनल सामना जिंकल्यानंतर ट्रॉफी उचलण्याची वेळ आली. टीम इंडिया आणि चाहते गेल्या 17 वर्षांपासून ही ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न पाहत होते. 17 वर्षांनंतर जेव्हा ट्रॉफी उचलण्याची वेळ आली तेव्हा रोहितला सुद्धा ती सामान्य पद्धतीने उचलायची नव्हती. यासाठी त्याने टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवकडून विशेष प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं. दरम्यान याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.



सोशल मीडियावर व्हायरल झाला कुलदीपचा व्हिडीओ


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जय शाहच्या हातून वर्ल्डकपची ट्रॉफी घेणार होता, यासाठी रोहितने खास युक्ती करून एन्ट्री घेतली. दरम्यान रोहितची ट्रॉफी उचलण्याची ही खास शैली अगोदरच ठरली होती जी कुलदीप यादवने त्याला सांगितली होती. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुलदीप यादव रोहित शर्माला वर्ल्डकप ट्रॉफी कोणत्या स्टाईलमध्ये उचलायची आहे हे सांगताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना मात्र फार आवडला आहे. मुख्य म्हणजे फुटबॉलचा स्टार खेळाडू मेस्सीचीही ट्रॉफी उचलण्याची अशीच शैली आहे.



@Iconic_Hitman नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कुलदीप आणि रोहित शर्माच्या या व्हिडीओला आतार्यंत अनेक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय युजर्स व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया देतायत. यावेळी एका यूजरने लिहिलंय की, कुलदीप यादवला माहित होते की ट्रॉफी अशा प्रकारे उचलली जाते. तर आणखी एका युजरने लिहिलंय की, ही फुटबॉलपटू मेस्सीची शैली आहे. तसंच, कुलदीप यादव गोलंदाजासह पार्ट टाईम कोच आहे, असंही एका युजरने म्हटलं आहे.