दुबई : मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आणखी एक कारनामा केला आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये आपले 5000 रन पूर्ण केले आहेत. अबुधाबी येथे किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितने हा विक्रम साकारला. त्यांच्याआधी फक्त दोन फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डावाच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर त्याने फोर मारत आयपीएलमध्ये 5000 रन पूर्ण केले. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात 5000 धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या अगोदर फक्त विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे. 180 सामन्यात विराट कोहलीने 5430 रन तर सुरेश रैनाने 193 सामन्यात 5368 रन केले आहेत.


रोहितने आयपीएलच्या 192 व्या सामन्यात 5000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत.


रोहितने या हंगामात आयपीएलमधील 200 सिक्स ही पूर्ण केले आहेत. आयपीएलमध्ये 200 सिक्स मारणारा रोहित दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी एमएस धोनीने हा रेकॉर्ड केला आहे.