व्हिडिओ : जेव्हा रोहित शर्मा `एलियन` सोबत थिरकतो...
7 एप्रिलपासून आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये पहिला सामना चैन्नई सुपरकिंग विरुद्ध मुंबई इंडियंस असा वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. सारेच संघ यंदाच्या पर्वासाठी कसून तयारी करताना दिसत आहेत. दरम्यान रोहित शर्माने कूल अंदाजातील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
मुंबई : 7 एप्रिलपासून आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये पहिला सामना चैन्नई सुपरकिंग विरुद्ध मुंबई इंडियंस असा वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. सारेच संघ यंदाच्या पर्वासाठी कसून तयारी करताना दिसत आहेत. दरम्यान रोहित शर्माने कूल अंदाजातील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर रोहित शर्मा
सध्या इंटरनेटवर एका प्रसिद्ध म्युजिकल अॅपचा ट्रेन्ड आहे. या अॅपची खास बात म्हणजे गाण्यावर तुम्ही एलियनसोबत डान्स करताना दिसत आहे. रोहित डमेटुकोसिटा गाण्यावर थिरकत आहे. यामध्ये एलियनसोबतचा रोहित शर्माचा डान्स धम्माल आहे.
व्हिडिओ शेअर करताना रोहितने खास संदेश लिहला आहे. यामध्ये " एलियनसोबत डान्स चॅलेन्ज मी स्वीकारलं. तुम्हांलाही हे डान्स चॅलेन्ज स्वीकारायचे असेल तर हे म्युझिकल अॅप नक्की डाऊनलोड करा.
मुंबई इंडियंसचं करणार नेतृत्त्व
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियंस दोनदा आयपीएल जिंकली आहे. नुकताच भारतीय संघाने रोहितच्या नेत्तृत्त्वाखाली निडास ट्रॉफीदेखील जिंकली आहे.
बॉल टॅम्परिंग प्रकरणी दाखवली खेळाडूंबाबत सहानूभुती
आयपीएल सुरू होण्यापूर्वी अवघे काही दिवस आधी क्रिक्रेट विश्व बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणाने ढवळून निघाले होते. स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर या बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या खेळाडूंबाबत रोहित शर्माने सहानुभूती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून रोहितने आपलं म्हणणं मांडलं होतं.