Rohit Sharma : मेव्हण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितीकासोबत लगावले ठुमके; तुम्ही पाहिलात का Video?
Rohit Sharma Dance Video: हिटमॅनच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित त्याचा मेव्हणा कुणाल सदजेहच्या लग्नाच्या कार्यक्रमात नाचतोय. यावेळी त्याची पत्नी रितीकाही त्याच्यासोबत डान्स फ्लोर शेअर करतेय.
Rohit Sharma Dance Video: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यामध्ये पहिली वनडे (IND vs AUS 1st ODI) खेळवण्यात येतेय. मात्र या सामन्यासाठी टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थितीत आहे. रोहितच्या जागी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करतोय. रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहच्या (Ritika Sajdeh) भावाचं लग्न असल्याने आजच्या सामन्यातून तो बाहेर आहे. दरम्यान अशातच आता रोहित मेव्हणाच्या लग्नात डान्स (Rohit Sharma Dance Video) केल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
हिटमॅनच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित त्याचा मेव्हणा कुणाल सदजेहच्या लग्नाच्या कार्यक्रमात नाचतोय. यावेळी त्याची पत्नी रितीकाही त्याच्यासोबत डान्स फ्लोर शेअर करतेय.
मेव्हण्याच्या लग्नात हिटमॅनचा जबरदस्त डान्य
रोहित शर्माचा मेव्हणा कुणाल त्याच्या लग्नबंधनात अडकणार आहे. यावेळी रोहित शर्माचा देखील एक खास अंदाज त्याच्या चाहत्यांना पहायला मिळाला. यावेळी डान्स फ्लोवर कुणाल, रितीका आणि रोहित एका पंजाबी गाण्यावर ठेका धरताना दिसतायत. दरम्यान हिटमॅनचा हा कूल आणि आगळ्यावेगळ्या अंदाज सर्वांना आवडलाय.
या कार्यक्रमासाठी रोहितने शेरवानी डिझाईनचा कुर्ता घातला आहे. तर सोबत गळ्यामध्ये लाल रंगाचा दुपट्टा घेतला आहे. तर रोहितची पत्नी रितीका देखील काळ्या आणि करड्या रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसतेय. या डान्समध्ये रोहित शर्माची पैसे उडवण्याची स्टेप खूप व्हायरल होतेय.
रोहित शर्माचं वनडे करियर
रोहित शर्मा लवकरच एका नव्या रोकॉर्डला गवसणी घालण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक रन्स करण्यात भारतीय कर्णधार रोहित आता केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. रोहितने 40 डावांमध्ये 61.33 च्या सरासरीने 2208 रन्स केले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वनडे सिरीजदरम्यान रोहित शर्माला एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये शतक ठोकलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सिरीजमधील सर्वाधिक शतकांच्या बाबतीत तो सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी करणार आहे. रोहितच्या नावावर 8 शतकं आहेत, तर सचिन तेंडुलकरने 9 शतकं झळकावली आहेत.