Rohit Sharma Injury IND vs BAN : बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. रोहित शर्मा यापुढे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही आणि कसोटी मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.


दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. याआधीहीच टीम इंडियासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली की, 'नक्कीच कुलदीप, दीपक आणि रोहित पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीत. कुलदीप आणि दीपक मालिकेतून बाहेर आहेत. रोहितही पुढचा सामना खेळू शकणार नाही.


वाचा : गुजरातमध्ये कोण मारणार बाजी? 


रोहितशिवाय दीपक चहर आणि कुलदीप सेन दोन खेळाडूही मुंबईला परतणार आहेत. दुसरा एकदिवसीय सामना खेळत असलेला दीपक हॅमस्ट्रिंगच्या समस्येशी झुंजत आहे, तर अनकॅप्ड खेळाडू कुलदीप सेनला पाठीला दुखापत झाली आहे.