Gujarat Election Result 2022 LIVE Vote Counting : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला होती. मात्र भाजपने आघाडी घेतली आहे. तर विरोधी पक्ष म्हणून गेल्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे या निवडणुकीत किती जागा मिळवणार याची उत्सुकता आहे.
8 Dec 2022, 13:45 वाजता
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) जामनगर उत्तर मतदारसंघातून विजयी झाल्यात. रिवाबा भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी आहे.
8 Dec 2022, 13:41 वाजता
Gujarat Election Result : 12 डिसेंबरला दुपारी 2 वाजता गुजरातमधील नव्या सरकारचा शपतविधी सोहळा होईल. मुख्यमंत्री शपथसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सहभागी होतील, अशी माहिती भुपेंद्र पटेल यांनी दिली. जनतेच्या आर्शीवादाने पुन्हा भाजपच सरकार स्थापन करणार आहे. गुजराथच्या जनतेचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार. त्यांनी मेहनत घेतली. या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान आहेत, असे भुपेंद्र पटेल यांनी यावेळी सांगितले. गुजरातच्या विकास यात्रेत अडथळा आणणाऱ्या शक्तींना नाकारून गुजरातच्या जनतेने भाजपला सत्ता दिली, असे प्रतिपादन भुपेंद्र पटेल यांनी केले.
Bhupendra Patel to take oath as Gujarat CM on December 12; PM Modi, Amit Shah to attend ceremony
Read @ANI Story | https://t.co/r5FUiLytGT#GujaratElectionResult #BhupendraPatel pic.twitter.com/DNKbwsACWI
— ANI Digital (@ani_digital) December 8, 2022
8 Dec 2022, 13:22 वाजता
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) 5 जागांवर विजय मिळवत 150 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने (Congress) 1 एका जागेवर विजय मिळवत 18 जागांवर आघाडी घेतली आहे तर AAP ने 5 तर इतर 3 जणांनी आघाडी घेतली आहे.
8 Dec 2022, 13:13 वाजता
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendrabhai Patel) विजयी झाले आहेत.
8 Dec 2022, 12:56 वाजता
11 डिसेंबरला सरकारचा शपथविधी सोहळा ?
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, नवीन सरकारचा शपथविधी 11 डिसेंबरला होऊ शकतो आणि पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, अशी बातमी सूत्रांकडून हाती आली आहे.
8 Dec 2022, 12:55 वाजता
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळताना दिसत आहेत. निकाल अजून लागला नसला तरी हाती आलेल्या कलवरुन भाजप एकनंबरचा पक्ष ठरलाय. गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजपच्या गांधी नगरमध्ये भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.कार्यकर्ते कार्यालयाबाहेर गरबा खेळताना दिसत आहेत.
8 Dec 2022, 11:41 वाजता
गुजरातमध्ये पुन्हा चित्र पालटलं, भाजप 150 पार
Gujarat Election Result : गुजरातमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत दिसत आहे. भाजप 154 जागांवर तर काँग्रेस 18 ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर आप 6 जागांवर पुढे आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 11:34 वाजता
गुजरातमधील 5 जागांचे निकाल जाहीर
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीत 5 जागांचे निकाल आले असून, त्यापैकी भाजपने 4 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.
8 Dec 2022, 11:21 वाजता
इसुदान गढवी खंभलिया मतदारसंघातून आघाडीवर
Gujarat Election Result : द्वारका जिल्ह्यातील खंभलिया विधानसभा मतदारसंघातून 'आप'चे मुख्यमंत्री उमेदवार इसुदान गढवी (Isudan Gadhvi) 18998 मतांनी आघाडीवर आहेत.
8 Dec 2022, 11:09 वाजता
गुजरात कल भाजपकडे, गांधीनगर भाजप कार्यालयात जल्लोष
Gujarat Election Result : गुजरात विधानसभा निवडणुकीतील शानदार कामगिरीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांधीनगरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार भाजप 182 जागांपैकी 152 जागांवर आघाडीवर आहे.