कोलंबो : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूत षटकार खेचत भारताने बांगलादेशच्या रोमांचक मुकाबल्यात विजय मिळवला आणि निदहास ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात बांगलादेशने विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सामन्याच्या अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी ३४ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिक धावून आला आणि त्याने भारताला विजय मिळवून दिला.


दिनेश कार्तिकने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. कार्तिकचा हा षटकार संपूर्ण जगाने पाहिला मात्र रोहित शर्माला तो पाहता आला नाही. जेव्हा क्रिकेट फॅन्स सौम्या सरकारचा शेवटचा बॉल पाहत होते आणि कार्तिकच्या विनिंग शॉटचे साक्षीदार होत होते तेव्हा रोहित ड्रेसिंग रुममध्ये वेगळी रणनीती बनवत होता. 



 


सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, मी शेवटचा बॉल पाहू शकलो नाही. शेवटच्या बॉलबाबत बोलायचे झाल्यास मी सुपर ओव्हरच्या तयारीला लागलो होते. मी पॅड बांधण्यासाठी गेले होते. मला वाटले जर चौकार लागला तर सुपर ओव्हर असण्याची संधी आहे. मी शेवटचा चेंडू पाहिला. मात्र ज्याप्रमाणे ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष केला जात होता त्यावरुन कार्तिने षटकार मारला आणि आपण जिंकल्याचे मला समजले.