धर्मशाला : रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाचा विजयाला आलेख वाढतानाच दिसतोय. वेस्ट इंडिजनंतर आता श्रीलंकेविरूद्धची टी-20 सिरीज टीम इंडियाने जिंकली आहे. शेवटचा सामना जिंकून श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न रोहित करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मशाला इथे झालेला दुसरा टी-20 सामना टीम इंडियाने 7 विकेट्सने जिंकला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने सिरीज जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यावेळी रोहित शर्मा कॉफी पिताना कॅमेरामध्ये कैद झाला. यावेळी कॉफी पिताना तो खूप कूल आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला.


कॅमेरामॅनसोबत रोहित शर्माची मस्ती


रोहित शर्मा कॉफी पिताना कॉम्प्यूटरच्या स्क्रिनकडे पाहत होता. याचवेळी त्याला कॅमेरामॅनने कॅमेरात कैद केलं. कॅमेरा रोहितवर असताना त्याचीही नजर कॅमेरावर गेली. यावेळी गंमतीच्या अंदाजात रोहितनेही कॅमेरामॅनला कॉफी पिण्याचा इशारा केला. यावेळी रोहितही हसत हसत हा इशारा करताना दिसला.



रोहितचा हा व्हिडीयो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI ने ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीयो पोस्ट करत बीसीसीआयने म्हटलं आहे की, धर्मशालेच्या थंडीच्या वातावरणात तुम्हाला काय पाहिजे, कॉफी.


टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिले होतं.  टीम इंडियाने हे विजयी आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17 चेंडूंआधी पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा सलग 11 वा विजय ठरला. मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या विजयाचा हिरो ठरला.