Rohit sharma : पत्नी रितिकासाठी रोहितची समुद्रात उडी; असं नेमकं काय घडलं पाहा VIDEO...!
Rohit sharma : सध्या रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) कर्णधारपदावरून अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेल्याचं दिसून आलं. यावेळी पत्नी रितीकाने एक पोस्ट केली असून ती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय.
Rohit sharma : नुकतंच इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल ( ICC World Test Championship ) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाला ( Team India ) पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने 209 रन्सने भारताला धुळ चारली. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) कर्णधारपदावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. हा सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) त्याच्या कुटुंबासोबत सुट्टीवर गेल्याचं दिसून आलं. यावेळी पत्नी रितीकाने एक पोस्ट केली असून ती सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय.
सुट्टीचा आनंद घ्यायला गेलेल्या रोहितसाठी ( Rohit sharma ) रितीकाने एक खास पोस्ट केलीये. रितिका सजदेह ( Ritika Sajdeh ) ची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांनी यावर रोहित शर्माचं कौतुक केलंय.
रितीकासाठी रोहितने समुद्रात मारली उडी
रितीका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह असते. नुकतंच रितीकाने रोहित ( Rohit sharma ) सोबत एक फोटो स्टोरीवर शेअर केलाय. या स्टोरीला कॅप्शन देताना रितीकाने ( Ritika Sajdeh ) लिहीलंय की, माझा मोबाईल पाण्यामध्ये पडला होता. या व्यक्तीने उडी मारून त्याला परत मिळवला.
दरम्यान यामध्ये रितीकाने ( Ritika Sajdeh ) रोहितचं ( Rohit sharma ) नाव मेंशन केलेलं नाही. मात्र समोर रोहित असून तिने तो व्यक्ती हिटमॅनचं असल्याचं समोर येतंय.
सुट्ट्यांचा आनंद घेतोय रोहित
सध्या टीम इंडियाचं शेड्यूल बिझी नसल्याने खेळाडू त्यांची पर्सनल लाईफ एन्जॉय करतायत. WTC नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना जवळपास एक महिला आराम करण्याची संधी आहे. टीम इंडियाचा पुढील दौरा हा 12 जुलै रोजी सुरु होणार आहे. अशातच रोहित शर्मा ( Rohit sharma ) त्याच्या कुटुंबासोबत बिचवर सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतोय. यावेळी रितीका ( Ritika Sajdeh ) आणि समायरासोबतचे अनेक फोटो शेअर केलेत.