रोहित शर्माच दर्यादिल! युवा खेळाडूला म्हणाला `कधीही गरज लागली तर...`
`कधीही गरज लागली तर फोन कर`, रोहित शर्मा असं कोणाला आणि का म्हणाला
मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएलमध्ये 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई टीमची यंदाच्या हंगामात वाईट कामगिरी आहे. मुंबई टीम 10 सामने पराभूत झाली असून प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकली नाही. सलग दुसऱ्या वर्षी मुंबईची निराशाजनक कामगिरी राहिली आहे.
यंदाच्या हंगामातही रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघू शकल्या नाहीत. रोहित एक सर्वोत्तम खेळाडूच नाही तर मित्र-कॅप्टनही आहे. रोहितने ही गोष्ट पुन्हा एकदा बायो बबल सोडताना सिद्ध केलं. बायो बबलमधून बाहेर पडताना युवा खेळाडू रमनदीप सिंहला त्याने बाय केलं.
रोहित शर्माने क्रिकेटप्रेमींची पुन्हा एकदा मनं जिंकून घेतली. रोहित शर्मा मैदानात जेवढा कूल असतो त्यापेक्षा जास्त मैदानाबाहेर आहे. बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर रमनदीप सिंहला काहीही मदत लागली तरी फोन कर असं रोहित सांगताना दिसत आहे.
रोहित शर्माचं दर्यादिल पुन्हा एकदा दिसलं. त्याने टीममधील खेळाडूंना काहीही मदत लागली तर फोन करा असं सांगितलं आहे. रोहित नेहमी मदतीसाठी तयार असतो. रोहितची ही गोष्ट टीममधील इतर सगळ्या खेळाडूंना माहीत आहे.
काळजी घे मित्रा कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल गरज लागली तर नक्की फोन कर असं रोहित शर्मा रमनदीपला सांगताना दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रमनदीपने आयपीएलमध्ये 4 सामने खेळले. त्याला 4 विकेट्स घेता आल्या. त्याने 34 धावांही टीमकडून खेळताना केल्या.