Rohit Sharma : अर्धशतक ठोकल्यावर भावूक झाला हिटमॅन, आकाशाकडे पाहिलं आणि...!
सामन्यानंतर आजच्या सामन्यात रोहित शर्माने कमबॅक (Rohit Sharma Comeback) केलं आहे. दरम्यान कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे.
Rohit Sharma half century: भारत आणि श्रीलंका (IND vs SL LIVE) यांच्यामध्ये 3 सामन्यांच्या वनडे सिरीजला (ODI series) आजपासून सुरुवात झाली आहे. या सिरीजमधील पहिला सामना 10 जानेवारी म्हणजेच आजपासून खेळवला जातोय. बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माला (Rohit Sharma) दुखापत झाली होती. या सामन्यानंतर आजच्या सामन्यात रोहित शर्माने कमबॅक (Rohit Sharma Comeback) केलं आहे. दरम्यान कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे.
भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनीही तुफान खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. यावेळी हिटमॅन चांगल्याच फॉर्ममध्ये दिसून आला. दुखापतीतून कमबॅक करत तुफान फलंदाजी केली आणि अर्धशतक ठोकलं आहे. ज्यानंतर रोहित शर्माने एकदम खास पद्धतने हाफ सेंच्युरीचं सेलिब्रेशन केलं आहे.
गुवाहाटीच्या मैदानावर Rohit Sharma नावाचं तुफान
रोहितने पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. आजच्या या सामन्यात रोहितने 83 रन्सची खेळी केली. ज्यामध्ये रोहितने 6 फोर आणि 2 सिक्स मारले. वनडे करियरमधील रोहितचं हे 47 वं अर्धशतक होतं. बांगलादेशाविरूद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं होतं.
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गेल्या अनेक काळापासून आउट ऑफ़ फॉर्म होता. त्याने वनडेमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना त्याचे 2019 मध्ये शेवटचं शतक झळकावलं होतं. तर 19 जानेवारी 2020 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतक झळकावलं होतं.
अर्धशतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा भावूक
दीर्घकाळानंतर कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं आहे. या हाफ सेंच्युरीनंतर रोहित भावूक झालेला दिसला. हिटमॅनने 50 अर्धशतक पूर्ण करत पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं आणि त्यानंतर हवेत बॅट फिरवली. त्याच्या हावभावावरून आकाशाकडे पाहून तो देवाचे आभार मानत होता.