Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ६८ रन्सने पराभव केला. या विजयासह भारताने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या म्हणण्यांनुसार, फायनलमध्ये धडक मारल्यानंतर रोहित शर्मा इमोशनल झाला आहे.


रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड विरूद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाच्य गोलंदाजांनी कमाल केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. १०३ रन्सवर इंग्लंड ऑलआऊट झाली आणि यानंतर भारताची टीम ड्रेसिंग रूमध्ये परतली. यावेळी आत जाण्यापूर्वी ड्रेसिंग रूमच्या बाहेर रोहित शर्मा शांत बसलेला दिसून आला. यावेळी रोहित भावूक झाला होता. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून विराट कोहली रोहितजवळ आल्याचंही दिसून येतंय. 



भारताकडून इंग्लंडचा पराभव


सेमीफायनलच्या सामन्यात भारताने ६८ रन्सने इंग्लंडचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत या सामन्या १७१ रन्स केले होते. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः रडवलं. अखेर भारतीय स्पिनर्ससमोर इंग्लंडचे फलंदाज १०३ रन्सवर ढेपाळले. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 25, जोस बटलरने 23, जोफ्रा आर्चरने 21 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 11 धावा केल्या. तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना ३-३ विकेट्स काढण्यात यश आलं.


रोहित शर्माची बॅट पुन्हा तळपली


इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा बदला घेण्याच्या मूडमध्ये दिसून आला. टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. ओपनिंगला आलेल्या रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्धही ९२ रन्सची खेळी केली होती.सेमीफायनलच्या सामन्यात रोहित विराटची विकेट गेल्यानंतरही डगमगला नाही. एका बाजूने त्याने स्वतःचा खेळ सुरु ठेवला आणि अर्धशतक झळकावलं.