Rohit Sharma Press Conference : क्रिकेटमधील सर्वात मोठं महामुकाबला म्हणजे भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामना. उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पत्रकार परिषद घेतली अन् सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पाकिस्तान संघाचं कौतुक केलं. तर भारतीय संघ प्रॅक्टिसवर भर देत असल्याचं त्याने म्हटलंय. पत्रकार परिषदेवेळी (Press Conference) रोहितच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास काहीसा डगमगलेला दिसत होता. त्यामुळे क्रिडा विश्वात चर्चा होत असल्याचं पहायला मिळतंय.


नेमकं काय काय म्हणाला Rohit Sharma?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचं नशिब चांगलं आहे की, आम्हाला आता दुखापतीचं ग्रहण लागलं नाही. लोकं म्हणता की महामुकाबला असेल, पण आमच्यासाठी असं नाही. आमच्यासाठी हा सामान्य सामना असेल. आम्ही संघ म्हणून सामोरं जाऊ. गेल्या 1 वर्षात आम्ही अनेकांना संधी दिली आहे. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आमच्याकडे आत्ताही एक संधी आहे. त्यामुळे मेहनतीच्या जोरावर आम्ही सामना जिंकण्य़ाचा प्रयत्न करू, असं रोहित शर्मा म्हणतो. त्यावेळी त्याने पाकिस्तान संघाचं कौतुक देखील केलं.


पाकिस्तानचा संघ हा एक सर्वोत्तम संघ आहे. नंबर 1 टीम बनणं कोणत्याही संघासाठी सोपी गोष्ट नसते. त्यामागे मेहनत असते. त्यांचा संघ मागील 1 ते 2 वर्षात उत्तम प्रदर्शन करतोय. त्याचं फळ त्यांना मिळत आहे. सर्व खेळाडू उत्तम कामगिरी करत असल्याचं देखील रोहितने यावेळी नोंदवलं. आमच्याकडे शाहीन, हॅरिस, नसिम नाहीयेत, पण आमच्याकडे जे बॉलर आहेत त्यांच्यासह आम्ही प्रॅक्टिस करतोय. त्यांच्याकडे अनेक वर्षापासून क्वालिटी बॉलर आहेत, असं म्हणत रोहितने पाकिस्तानला शेवग्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न केला.


कॅप्टन असावा तर असा...


गेल्या काही वर्षांत मी अनेक जोखीम घेऊन खेळलो आहे, मला एकदिवसीय सामन्यांमध्ये समतोल राखावा लागेल, एक आघाडीचा फलंदाज म्हणून व्यासपीठ निश्चित करण्याची जबाबदारी माझी आहे, असं रोहित शर्मा म्हणतो. त्यामुळे आता पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा सलामीसाठी उतरेल, अशी शक्यता आहे. त्यासोबत शुभमन गिल असेल की इशान किशन? हा सवाल मात्र कायम असेल.



दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकायचा असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल. टॉस जिंकला तर सामना जिंकला, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे काही बारीक बारीक योजना तयार करावी लागेल. तुम्हाला तुमच्या खेळाडूंची ताकद ओळखून मैदानात त्या योजनेने प्लेईंग इलेव्हन मैदानात उतरावी लागेल, असं रोहित शर्मा म्हणतो.