Virat Kohli-Rohit Sharma Cry: वर्ल्डकप टीम इंडिया जिंकणार या आशेवर असलेल्या सर्व भारतीयांचा रविवारी रात्री हिरमोड झाला. पुन्हा एकदा सर्व भारतीयांच वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यंदाचा वर्ल्डकप भारतात आजोयित केला गेला असल्याने टीम इंडिया प्रमुख दावेदार मानली जात होती. मात्र फायनलपर्यंत अजिंक्य राहिलेली टीम इंडिया अंतिम सामन्यात पराभूत झाली आणि कोट्यांनी देशवासीयांची पायाखालची जमीन सरकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यात झालेल्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या भर मैदानातच रडू कोसळलं. मैदानावर रडत असलेल्या मोहम्मद सिराजला जसप्रीत बुमराहने सांभाळून घेतलं. तर कर्णधार रोहित पाणावलेल्या डोळ्यांनी मैदानाबाहेर जाताना दिसला. 


विराट कोहलीचा व्हिडीओ होतोय व्हायरल


ऑस्ट्रेलियाने केलेल्या पराभवानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसतं होतं. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 रन्सची गरज असताना त्याची ही भावनिक मोमेंट कॅमेरात कैद झाली. त्यानंतर भारतीय टीमचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. यावेळी किंग कोहलीचे डोळेही पाणावले होते. 


वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय


वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला आलेली भारतीय टीम डगमगताना दिसली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया केवळ 240 रन्स करू शकली. यावेळी केएल राहुलने 107 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी तर विराट कोहलीने 54 रन्सची खेळी खेळली. 


कर्णधार रोहित शर्माचं या सामन्यात पुन्हा एकदा अर्धशतक हुकलं. रोहितने 31 बॉल्समध्ये 47 रन्स केले. तर सूर्यकुमार यादवलाही मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन टीमकडून मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेतले. तर पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतले.


टीम इंडियाने दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया आक्रमक फलंदाजीच्या मुडमध्ये मैदानात उतरली होती. रोहितने मोहम्मद शमीला सुरूवातीच्या स्पेलमध्ये गोलंदाजीला आणलं अन् शमीने कांगारूंना पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन विकेट्स काढल्या. 


मात्र ऑस्ट्रेलियाने रनरेट खाली पडून दिलं नाही. टीम इंडियाला खरा धोका होता, तो ट्रेविस हेड याच्याकडून. ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवलं. पिच जसं जसं स्लो झालं, तसं तसं शमीची स्विंग चालली ना शमीचा यॉर्कर.. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 130 कोटी भारतीयांचं मन तोंडून वर्ल्ड कपवर कब्जा मिळवला आहे.