IPL 2023 : यंदा Arjun Tendulkar चा डेब्यू होणार? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यंदाच्या सिझनमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
Arjun Tendulkar : येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला (IPL 2023) सुरूवात होतेय. यावेळी सर्व क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच मुंबईं इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमच्या प्लेईंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) समावेश केला जाऊ शकतो. आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी अर्जुनबाबत मोठं विधान केलं आहे.
गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यंदाच्या सिझनमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. अर्जुनच्या खेळण्याबाबत मुंबईचा कर्णधार अर्जुन तेंडुलकर आणि मार्क बाऊचर यांनी संकेत दिले आहेत?
आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य कोच मार्क बाऊचर यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी अर्जुनबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, गेल्या काही दिवसांमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगला खेळ केला. मात्र त्याला दुखापत झाली होती. मात्र आता तो गोलंदाजीला सुरुवात करणार आहे.
यावेळी मार्क बाऊचर यांनी सांगितलं की, अर्जुनने खरंच चांगला खेळ केला असून तो गोलंदाजी चांगली करतोय. मला असं वाटतं तो, यंदा मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट असून शकतो.
रणजी ट्रॉफीत चमकला होता अर्जुन
अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याच्या टीमकडून खेळला. यावेळी पदार्पण करताना अर्जुनने 179 बॉल्समध्ये शानदार शतक पुर्ण केलं. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने शतक झळकावलं होतं. याशिवाय त्याने गोलंदाजीमध्येही कमाल दाखवली होती.
मुंबई इंडियन्सची आयपीएल 2023 संपूर्ण टीम
रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कैमरून ग्रीन, पीयूष चावला, झे रिचर्डसन, डुआन जानसेन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल