बाहेर आलास तर...; कर्णधार Rohit Sharma ने बांगलादेशी फलंदाजाला का दिली धमकी?
बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजाला अक्षरश: धमकी दिली.
T20 World Cup: ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया सध्या चांगला खेळ करतेय. कालच्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा (IND vs BAN) पराभव केला. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तरीही टीम इंडियाने बाजी मारत 5 रन्सने बांगलादेशचा पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक वेळ अशी आली होती, ज्यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजाला अक्षरश: धमकी दिली.
पावसानंतर ज्यावेळी सुरू झाला तेव्हा टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामन्याचं रूपचं पालटलं. 4 विकेट्स गेल्यानंतर बांगलादेशचा विकेटकीप नुरुल हसन (Nurul hasan) 4 फलंदाजीसाठी उतरला. नॉन स्ट्रायकरच्या एंडला राहून तो सतत बॉल टाकण्यापूर्वी क्रिझबाहेर जात होता. त्याचा हा प्रकार पाहून भारतीय कर्णधार रोहित शर्मा संतापला. रोहित लगेच नुरुल हसनला इशारा दिला आणि म्हणाला, जर पुन्हा बाहेर पडलास तर स्टंप उडवेन.
रोहित शर्माचं हे वाक्य स्टंपच्या माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. रोहितने बांगलदेशाच्या फलंदाजाला मंकडींगचा कडक शब्दात इशारा दिला आहे.
आयसीसीनेही नियम बदलले
नॉन-स्ट्रायकरच्या एंडला फलंदाज क्रीझमधून बाहेर पडला आणि गोलंदाज त्याला रनआऊट केलं असतं तर ते खेळाच्या भावनेच्या विरुद्ध गेलं असतं. मात्र गेल्या महिन्यात आयसीसीने नियम बदलले आहेत. यापुढे मंकडींग करणं खेळाच्या भावनेच्या विरोधात मानलं जात नाही.
या नियमानुसार गोलंदाज फलंदाजाला कोणत्याही इशाऱ्याशिवाय बॉल टाकण्यापूर्वी बाद करू शकतो. मात्र, या T20 वर्ल्डकपमध्ये एकही फलंदाज अशा प्रकारे बाद झालेला नाही.
मिलरलाही दिलेला इशारा
टीम इंडिया बांगलादेशपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर बॉल टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर एंडकडून सतत क्रीज सोडत होता. त्यावेळी अश्विन एका प्रसंगी गोलंदाजी करण्यापूर्वी थांबला आणि त्याने मिलरला क्रिझ न सोडण्याचा इशारा दिला.
फेक फ्लिडींगचा वाद निर्माण
भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या 35 व्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 5 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 184 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशचा संघ 16 ओव्हरमध्ये 6 बाद 145 धावाच करू शकला. पावसामुळे ओव्हर लिमिट कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, मॅचनंतर चर्चाचा विषय ठरला तो विराट कोहली...
बांग्लादेशचा विकेटकीपर फलंदाज नुरुल हसन यानं भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग' (Fake Fielding) केल्याचा आरोप केलाय. त्यासाठी बांग्लादेशच्या संघाला दंड म्हणून पाच धावा मिळायला हव्या होत्या, असंही नुरुलनं (Nurul hasan) म्हटलंय. त्याच्या या आरोपानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.