Rohit Sharma : माझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून `या` व्यक्तीला घातली लग्नाची मागणी
Rohit Sharma Proposes Fan : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय.
Rohit Sharma Proposes Fan :ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (India vs Australia) यांच्यामध्ये आज दुसरा वनडे (IND vs AUS ODI Series 2023) सामना खेळवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. यावेळी टीमच्या एकाची फलंदाजाला चांगला खेळ करता नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) या सामन्यात कमबॅक झालं आहे. मात्र रोहित देखील या सामन्यात फेल गेला. पण सामन्यापूर्वी रोहितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय.
नेमकी घटना काय?
विशाखापट्टनम एयरपोर्टच्या एअरपोर्टवर रोहित शर्माने त्याच्या एक चाहत्याला प्रपोज केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चाहता इंडियाची संपूर्ण टीम बाहेर येण्याची वाट पाहत होता. यावेळी रोहित शर्माला पाहून या चाहत्याने त्याच्या हातात गुलाब दिलं. यावेळी रोहितने गुलाब त्याला देत विचारलं की, Will you marry me? दरम्यान रोहित शर्माचा मस्तीचा मूड पुन्हा एकदा चाहत्यांना पहायला मिळाला.
रोहितची चाहत्यासोबतची गंम्मत कॅमेरात कैद
या चाहत्यासोबत रोहितने केलेली ही गंमत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. रोहित शर्मा नेहमी त्याच्या चाहत्यांचा सन्मान करतो, कधीही त्यांना दुखवत नाही.
दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितचं कमबॅक
टीम इंडियाने 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधील पहिला सामना जिंकला आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणाने सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. रोहितच्या पत्नीचा भाऊ कुणाल सजदेह याचं लग्न असल्याने पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नव्हता.
दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये दोन मोठे बदल करण्यात आले असून इशान किशनच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) चं कमबॅक झालंय. तर शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला प्लेइंग-11 टीममध्ये संधी देण्यात आलीये. मात्र टीम इंडियाने फलंदाजीमध्ये फार खराब कामगिरी केली आहे.