मुंबई : टीम इंडियाचा विद्यमान कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हाचा आज वाढदिवस आहे. २१ डिसेंबर १९८७ ला तिचा जन्म झाला. रोहितने आपल्या बायकोला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने पत्नीचा फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर करत त्यावर साजेशी कॅप्शन दिली. 'मला नेहमी अस वाटत तू खुश असावीस, जशी या फोटोमध्ये दिसतेयस ! जन्मदिवसाच्या शुभेच्छा '


पोस्ट व्हायरल 



 ही पोस्ट ३ लाखाहून अधिक जणांनी पाहिली आहे. दिड हजाराहून अधिक लोकांनी यावर कमेन्ट्स केल्या आहेत. 


पत्नीला फ्लाइंग किस


याआधी रोहित शर्माने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला २०८ रन्सची तुफानी खेळी केली.  त्यावेळी वन डेतील करिअरमधील तिसरे द्वीशतक पूर्ण करत आपल्या पत्नीला फ्लाइंग किस दिले.


रोहितच्या द्विशतकानंतर रितीका भावूक झाली. त्यावेळी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. 


लग्नाला २ वर्षे 


एप्रिल २०१५ ला रोहितने साखरपुडा केला तर १३ डिसेंबर २०१५ ला त्याने लग्न केले. लग्नाआधी साधारण ६ वर्षे ते एकमेकांना ओळखत होते. 


रितीकाही स्पोर्ट्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मॅनेजर होती. तेव्हापासून ते दोघेही चांगले मित्र होते.