Rohit Sharma: विराट कोहलीनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची (Rohit Sharma) नियुक्ती करण्यात आली. यावेळी हिटमॅनने देखील त्याला सोपवलेल्या कर्णधारपदासाठी उत्तम कामगिरी केली. रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळतेय. अशातच त्याने माजी कोच रवी शास्त्री (Ravi shastri) यांना उद्देशून एक विधान केलं आहे. दरम्यान त्याच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. 


रवी शास्त्रींवर संतापला रोहित?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा जेव्हापासून कर्णधार झाला आहे, तेव्हापासून त्याने केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत नाही, असं क्वचितच घडतं. नुकतंच रवी शास्त्री यांच्याविषयी बोलताना संताप व्यक्त केला आहे. चौथ्या टेस्टपूर्वी जेव्हा रोहितला कोचच्या तुलनेविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला, खरं सांगायचं तर जेव्हा तुम्ही 2 सामने जिंकता तेव्हा बाहेरील लोकांना वाटतं की, आमच्यात अतिआत्मविश्वास आहे. परंतु हा मुर्खपणा असून आम्ही अशा गोष्टींना किंमत देत नाही. कारण तुम्ही सर्व चार सामन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करू इच्छितो.


इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणीनिती आणि कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा खेळाडूंचा बचाव करताना दिसला. रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, "2 सामने जिंकून तुम्ही थांबणं पसंत करत नाही, मात्र हे तितकं सोपं नाहीये. मात्र ज्या व्यक्ती अतिआत्मविश्वासाबद्दल बोलतात आणि खासकरून तेव्हा जेव्हा ते ड्रेसिंग रूमचा भाग नसतात, त्यांना ड्रेसिंग रूममध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली हे माहित नसतं"


'रवी शास्त्री स्वतः एकदा ड्रेसिंग रूमचा एक भाग होते आणि त्यांना माहित आहे की, आपण खेळतो तेव्हा आपली मानसिकता नेमकी कशी असते. हे अतिआत्मविश्वास नसून निर्दयी असण्याशी जोडलेलं आहे. निर्दयी हा शब्द प्रत्येक क्रिकेटरच्या मनात येतो आणि तो परदेश दौऱ्यावर असताना विरोधी टीमला किंचितही संधी न देण्याशी संबंधित आहे, असंही रोहित शर्माने म्हटलंय.