लाखोंच्या गर्दीत रोहित बसमधून खाली उतरला आणि...; विक्टरी परेडमधील हिटमॅनचा Video Viral
Rohit Sharma: मुंबईच्या रस्त्यांवर `मुंबईचा राजा रोहित शर्मा` असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली.
Rohit Sharma Viral Video: गुरुवारी टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच भारतात आली. यावेळी टीम इंडियाचं चाहत्यांकडून जंगी स्वागत देखील करण्यात आलं. दिल्लीनंतर टीम इंडियाची मुंबईच्या रस्त्यावर विक्टरी परेड (Team India Victory Parade) घेण्यात आली. यानंतर वानखेडेच्या स्टेडियमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान परेडनंतर टीम इंडिया वानखेडेमध्ये जाताना रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबईच्या रस्त्यांवर 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' असे नारे लागले होते. टीम इंडियाचा रोड शो मुंबईमध्ये पार पडला. ज्या ठिकाणी टीम इंडिया बसच्या छतावर मरीन ड्राइव्ह मार्गे वानखेडे स्टेडियमवर पोहोचली. दरम्यान, याचवेळी लाखोंच्या गर्दीत कर्णधार रोहित शर्मा बसमधून खाली उतरला आणि धावत आणि नाचत स्टेडियममध्ये पोहोचला. यावेळी बाकीची टीम बसमध्येच होती. यावेळी रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
रोहितच्या भाषणाने हार्दिक पंड्या भावूक
वानखेडेच्या मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भाषण केलं. यानंतर भारताचा स्टार खेळाडू आणि ऑलराऊंडर हार्दिक पंड्या रोहित शर्माचे भाषण ऐकून रडला. भारताच्या T20 वर्ल्डकप 2024 च्या विजयाच्या उत्सवादरम्यान बोलताना शर्माने विजेतेपदाचे श्रेय हार्दिक पांड्याला दिलं.
रोहित शर्मा म्हणाला की, पांड्याच्या शांत आणि संयमी क्षमतेमुळे भारताला डेव्हिड मिलरला बाद करण्यात मदत झाली. मिलरला टीम जगातील सर्वात धोकादायक खेळाडूंपैकी एक मानत होती. दरम्यान रोहित शर्माने हे शब्द ऐकताच हार्दिक पंड्याचे डोळे पाणावले. याचं कारण म्हणजे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने रोहितचं कर्णधारपद काढून हार्दिकला देण्यात आलं होतं. यावेळी वानखेडेच्या मैदानावर हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.
रोहित-विराटचा स्टेडियममध्ये खास डान्स
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चक दे इंडियाच्या तालावर डान्स करत आनंद साजरा केला. मरीन ड्राईव्हच्या ओपन-टॉप बसमध्ये विजय परेडनंतर भारतीय संघ रात्री 9 वाजता वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. वानखेडे स्टेडियमवर पोहोचल्यानंतर रोहितने विराट कोहलीला आपल्यासोबत स्टँडकडे खेचले आणि दोघांनीही भांगडा देखील केला.