Rohit Sharma: काल मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) मुंबईचा 55 रन्सने पराभव केला. यंदाच्या सिझनमधील मुंबईचा हा चौथा पराभव होता. तर दुसरीकडे गुजरातच्या टीमचा हा पाचवा विजय होता. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा निराश झाल्याचं दिसलं. मात्र या सामन्यामध्ये कर्णधार रोहितचा रूद्र अवतार (Rohit Sharma Angry) पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. याचा फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्डींग असो किंवा फलंदाजी अनेकदा रोहित शर्मा भर मैदानाच चिडताना दिसतो. असंच गुजरात विरूद्धच्या सामन्यात देखील पहायला मिळालं. गुजरातची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. यावेळी रोहित पियुष चावलावर संतापलेला दिसला. त्याचा हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.


गुजरातविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गुजरात टीमच्या फायद्याचा ठरला. गुजरातच्या टीमने यावेळी 20 ओव्हर्समध्ये 207 रन केले. मात्र यावेळी 17 व्या ओव्हरमध्ये अशी घटना घडली, ज्यामळे रोहित शर्मा चांगचाल वैतागलेला दिसला. 


पियुषवर संतापला रोहित शर्मा


17 व्या ओव्हरमध्ये अभिनव मनोहर उत्तम पद्धतीने फलंदाजी करत होता. यावेळी त्याने एक शॉट खेळला आणि हा शॉट थर्ड मॅनकडे गेला. त्याठिकाणी पियुष चावला फिल्डींग करत होता आणि त्या बॉल पकडू शकला नाही. परिणामी हा बॉल बाऊंड्री पार गेला आणि त्यामुळे गुजरातच्या टीमला 4 रन्स मिळाले. याच घटनेमुळे रोहित शर्मा पियुष चावलावर चांगलाच संतापला. 


रोहित शर्माने वापरले अपशब्द?


मुख्य म्हणजे, यावेळी रोहित शर्मा इतका संतापला होता की, त्याने चावलासाठी अपशब्दही वापरले होते. इतर खेळाडूंवर भडकण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अनेकदा रोहित शर्मा त्याच्या साथीदारांवर भडकलेला दिसला. टीम इंडियामध्ये त्याचं हे रौद्र रूप पहायला मिळालं होतं. 



मुंबईचा चौथा पराभव


गुजरातने मुंबईचा 55 रन्सने पराभव केलाय. 208 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि इशान किशन मैदानात उतरले होते. मात्र यावेळी दोघांनाही चांगला खेळ करता आला नाही. रोहित शर्मा 2 रन्स तर इशान किशन 13 रन्सच्या खेळीवर माघारी परतला होता. ग्रीन आणि सूर्यकुमारने काही मोठे शॉर्ट खेळले. मात्र त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही. अखेरीस मुंबईचे फलंदाज 20 ओव्हर्समध्ये 152 रन्सपर्यंतच मजल मारू शकली.