Rohit Sharma: सूर्याला `सुपला` शॉट रोहितकडून मात्र `चुकला`; नकोसा रेकॉर्ड केला नावे
Rohit Sharma: आजच्या सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र सूर्याच्या शॉर्टची नक्कल करण्याच्या नादात रोहितने आपल्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवलाय.
Rohit Sharma: आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात सामना रंगलाय. हा आयपीएलमधील ( IPL 2023 ) एस क्लासिको सामना मानला जातो. या सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चेन्नईविरूद्धच्या सामन्यात फेल गेला. या सामन्यात रोहितला ( Rohit Sharma ) भोपळाही फोडता आला नाही. अशातच शून्यावर आऊट झाल्यानंतर रोहितच्या नावे एक नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेलाय.
चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने ( MS Dhoni ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईच्या ( Mumbai Indians ) टीमसाठी घातक ठरला. आजच्या सामन्यात मुंबईच्या टीमने ओपनिंग जोडी बदलली. त्याने रोहित ( Rohit Sharma ) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. मात्र शून्यावरच तो पव्हेलियनमध्ये परतला. यावेळी एक लज्जास्पद रेकॉर्ड हिटमॅनच्या नावे झालाय.
हिटमॅनच्या नावे नकोसा रेकॉर्ड
चेन्नईविरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. याला रोहित शर्मा ( Rohit Sharma ) देखील अपवाद ठरला नाही. रोहित शर्मा आजच्या सामन्यात धरून 16 वेळा आयपीएलमध्ये शून्यावर बाद झाला आहे. हिटमॅननंतर सुनील नरेन, मनदीप सिंह आणि दिनेश कार्तिक यांचा या लिस्टमध्ये समावेश होतो. हे तिन्ही खेळाडू आतापर्यंत 15-15 वेळा शून्यावर बाद झालेत. तर 16 वेळा शून्यावर बाद होणारा रोहित ( Rohit Sharma ) एकमेव खेळाडू आहे.
सूर्याला कॉपी करणं रोहितला पडलं महागात
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) फलंदाजी करत असताना दीपक चाहर तिसरी ओव्हर टाकत होता. यावेळी चाहरने असा एक बॉल टाकला ज्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सहजतेने फसला. चाहरने रोहितला एक गुड लेंथ बॉल टाकला. यावर हिटमॅनने सूर्यकुमार यादवसारखा अतरंगी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला तो जमला नाही. रोहितने हा शॉट मारला खरा मात्र शॉर्ट थर्ड मॅनजवळ उभ्या असलेल्या रविंद्र जडेजाने कॅच घेतला आणि रोहितला ( Rohit Sharma ) माघारी परतावं लागलं. त्यामुळे आजच्या सामन्यात सूर्याला कॉपी करणं रोहितला चांगलंच महागात पडलंय.