देशभरात साजरा झाला धुळवडीचा सण. रंगात रंगून प्रत्येकाने या सणाचा आनंद लुटला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच रंगामध्ये रंगून केले होते. अशावेळी भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा चर्चेतील खेळाडू रोहित शर्मा देखील हा रंगाचा उत्सव खेळण्यापासून मागे नव्हता. रोहितने आपला होळी खेळण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. 37 वर्षांचा रोहित अगदी 10 ते 15 वर्षांचा मुलगा धुलिवंदन खेळतो तसाच अगदी रंगांनी खेळत होता. याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये रोहित शर्मा मुलगी समायरासोबत धुलिवंदन हा सण अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने खेळताना दिसत आहे. रोहितने होळी सेलिब्रेशनचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो समायरासोबत दिसत आहे. रोहितच्या हातात पिचकारी देखील दिसत आहे. दुसऱ्या चित्रात तो एका व्यक्तीवर गुलाल उधळत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'थोडा रंग, थोडी मजा.'


पहिल्या सामन्यात मात्र पराभव 


रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला होता. नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने IPL 2024 मध्ये होलिका दहनाच्या दिवशी गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला. रोहित शर्माने 2013 च्या मोसमानंतर प्रथमच कर्णधार म्हणून आयपीएलला सुरुवात केली नव्हती. पण या सामन्यात त्याच्या बॅटची जादू मात्र चालली. असं असतानाही संघाला पराभव स्विकारावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई एके काळी विजयाच्या जवळ जाताना दिसत होती. पण अखेर गुजरातने हा सामना 6 धावांनी जिंकला. आता मुंबईचा पुढचा सामना 27 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.