Rohit Sharma Injured : येत्या गुरुवारी भारत आणि इंग्लंड (INDvsENG) या दोन तगड्या संघात दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. अॅडिलेटच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 1st Semi Finals) सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन रोहित शर्मा नेट्समध्ये बॅटिंग करत असताना जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितला दुखापत (Rohit Sharma Injured) झाल्यानंतर त्यानं लगेचच सराव थांबवण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर टीम इंडियाचा हा कर्णधार लगोलग ड्रेसिंग रुममध्ये गेला. मात्र, त्यावेळी रोहित चांगलाच संतापल्याचं दिसून आलं. कारण होतं टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशलिस्ट (Throwdown Specialist) आणि पडद्यामागील हिरो रघु राघवेंद्र...


नेमकं काय झालं?


झालं असं की... रघु राघवेंद्र (Raghu Raghavendra) टीम इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट आहे. टीम इंडिया सेमीफायनलपुर्वी मैदानात घाम गाळत होती. रघुने केलेला शॉर्ट पीच थ्रो रोहितच्या उजव्या मनगटाच्या वर चांगलाच लागला. हा बॉल इतका जबर बसला की रोहितने हातातील बॅट सोडली. त्यानंतर रोहित चांगलाच संतापला होता.



रोहितचा आवेश पाहून रघू चांगलाच घाबरला आणि त्यानं मैदान सोडलं. रोहितवर त्यावेळी उपचार सुरू झाले. रोहितला ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) नेण्यात आलं. त्यानंतर रोहित पुन्हा मैदानात परतला. त्यावेळी रघू मात्र मैदानात दिसेना. त्यामुळे रघु कुठंय?, असा सवाल रोहितने विचारला. रघू मात्र गायब...



दरम्यान, रोहित आणि कोचच्या ओरडा खालल्यानंतर रघू मात्र ड्रेसिंग रूममध्ये जाऊन लपला होता. त्यानंतर त्याला नेट्समध्ये बोलवा, असं निमंत्रण रोहितने धाडलं. त्यानंतर देखील गडी खाली येईना. त्यानंतर दिनेश कार्तिकने समजदारपणा दाखवत रघूला चुक सांगितली आणि त्याला खाली घेऊन आला.