Arjun Tendulkar : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमची सुरुवात फारशी चांगली झालेली दिसली नाही. मात्र तिसरा म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा सामना मुंबईने आपल्या खिशात घातला. यावेळी मुंबईच्या चाहत्यांना एक अपेक्षा होती, ती म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुकरला (Arjun Tendulkar) खेळताना पहायची. मात्र यावेळी तिन्ही सामन्यांमध्ये एकदाही त्याला संधी दिली गेली नाही. 


सबस्टिट्यूट म्हणून अर्जुनच्या नावाचा समावेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन सामन्यामध्ये मुंबईच्या चाहत्यांना असं वाटलं होतं की, अर्जुनचा समावेश टीममध्ये केला जाईल. कारण 5 खेळाडूंच्या सबस्टिट्यूट लिस्टमध्ये अर्जुनच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. मात्र तरीही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अर्जुनच्या नावाचा विचार केला गेला नाही. यामुळे चाहते आता, त्यासा टीममध्ये संधी कधी देणार असा प्रश्न करतायत.


सचिन तेंडुलकरने त्याच्या वयाच्या 16व्या वर्षीच टीम इंडियामध्ये डेब्यू केलं होतं. त्याच्या उत्तम खेळाच्या जोरावर त्याने संपूर्ण जगात स्वतःचं नाव उंचावलं. मात्र रोहित शर्मा एवढ्या मोठ्या खेळाडूच्या मुलाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का देत नाहीये, असा सवाल उपस्थित होतोय. 


अर्जुनला अजूनपर्यंत संधी का नाही?


गेल्या 2 दोन वर्षांपासून अर्जुन मुंबईच्या टीममध्ये आहे. मात्र त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान रोहित शर्मा कदाचित अर्जुनला आयपीएलच्या स्तराचा खेळाडू समजत नसावा, म्हणून त्याला मुंबईच्या टीममध्ये संधी मिळत नाहीये. यामागे कारण म्हणजे, अर्जुनचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रेकॉर्ड फारसा चांगला नाही.


अर्जुनचा डोमेस्टीक क्रिकेट रेकॉर्ड कसा आहे?


अर्जुन मुंबई इंडियन्सकडून एकंही सामना खेळलेला नाही. त्याने आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलं असून केवळ 7 सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. त्याने 11 इनिंग्समध्ये 3.42 च्या इकोनॉमीने 12 विकेट्स काढले. त्याने लिस्ट-A च्या एकूण 7 सामन्यामध्ये त्याने 4.98 च्या इकॉनॉमीने 8 विकेट्स घेतल्या आहेत. 


अर्जुन तेंडुलकरने टी-20 फॉर्मेटमध्ये 9 सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला अर्जुन आयपीएलचे सामने खेळण्यासाठी पात्र वाटत नसावा. याच कारणामुळे त्याला टीममध्ये संधी देण्यात येत नसावी.