मुंबई : तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 228 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलाच फटका बसला. दीपक चहर चांगली गोलंदाजी करत होता, पण डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरचा कॅच त्याला भारी पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहरने आपल्या पहिल्या तीन ओव्हरमध्ये फक्त 24 रन्स दिले होते, तर दक्षिण आफ्रिकेने त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये संपूर्ण 24 रन्स लुटले. यादरम्यान दीपक चहरचं भीषण रूप पाहायला मिळाले. चहर सहकारी खेळाडू मोहम्मद सिराजवर चांगलाच चिडला होता. इतकंच नाही तर यावेळी रोहित शर्मा देखील चांगलाच सिराजवर वैतागलेला दिसला.


चहरकडून सिराजला शिवीगाळ 


20व्या ओव्हरमध्ये मिलरचा फटका डीप स्क्वेअर लेगला गेला. तिथे सिराज फिल्डींग करत होता. सिराजने कॅच घेतला, पण यादरम्यान त्याचा पाय थेट बाऊंड्रीला लागला. क्षणार्धात विकेटचं रूपांतर सिक्समध्ये झालं. हे दृश्य पाहून चाहरला राग अनावर झाला आणि त्याने सिराजला शिवीगाळ केली.



रोहितने देखील जोडले हात


सिराजच्या या कृत्याने कर्णधार रोहित शर्मा चांगलाच वैतागला होता. इतकंच नाही तर त्याने भर मैदानात सिराजला हात जोडून दाखवले.  



दक्षिण आफ्रिकेचा विजय


दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं होतं. 228 धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्यासाठी ढासाळली. रोहित शर्माला भोपळा फोडता आला नाही. दिनेश कार्तिकने सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र, इतर कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. दीपक चहरने अखेरीस फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.