Rohit Sharma Angry : भारतीय क्रिकेट टीमचा नियमित कर्णधार (Rohit Sharma) न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात तब्बल 3 वर्षानंतर शतक झळकावलं. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सेंच्युरी झळकवत शतकांचा दुष्काळ संपवला आहे. ज्यामुळे सध्या त्याच्या नावाची फारच चर्चा सुरु आहे. हिटमॅनचं (Hitman) हे 30 वं शतक होतं. आगामी वर्ल्डकपकडे (ODI world cup) पाहता टीम इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत. मात्र तिसऱ्या वनडे सामन्यानंतर (Rohit Sharma) ब्रॉडकास्टरवर संतापला असल्याचं दिसून आलं. 


ब्रॉडकास्टर भडकला Rohit Sharma


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगली कामगिरी केलीये. दरम्यान 30 वं शतक झळकावल्यानंतर ब्रॉडकास्टर द्वारे त्याचे आकडे दाखवण्यात आले. ज्यामध्ये जानेवारी 2020 च्या नंतर रोहितचं हे पहिलं शतक असल्याचं दाखवण्यात आलं. म्हणजेच तब्बल 3 वर्षांनी हे शतक रोहितने झळकावलं होतं. दरम्यान हे आकडे पाहताच रोहित शर्मा चांगलाच संतापला. 


या सामन्यानंतर रोहित शर्माने एका रिपोर्टरला म्हटलं, तीन वर्षानंतर मारलेल्या शतकाबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 3 वर्षात मी केवळ 12 वनडे खेळलो आहे. तीन वर्ष जास्त वाटतात तुम्हाला, मात्र नेमकं कारण काय आहे, हे पण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. मला माहितीये हे, बॉडकास्टरने दाखवलं आहे, त्यांनी देखील योग्य ती गोष्ट प्रसारित केली पाहिजे.


यावेळी रोहितला एका रिपोर्टरने प्रश्न केला की, हे हिटमॅनचं कमबॅक आहे का? यावर रोहित शर्माने उत्तर दिलं की, 2020 मध्ये कोणताही सामना मी खेळलो नाही. कोरोनामुळे सर्वजण घरी बसलो होते. मी दुखपतग्रस्त असल्याने वनडे सामना खेळलो नाही. त्यावेळी मी टेस्ट सामना खेळलो. त्यामुळे आपण त्या दृष्टीकोनातून देखील पाहिल पाहिजे. 


टी20 मध्ये सूर्यापेक्षा चांगला खेळाडू नाही


सूर्यकुमार यादवविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, आम्ही गेल्या वर्षी टी-20 क्रिकेट खेळलो. सध्याच्या घडीला सूर्यापेक्षा चांगला खेळाडू कोणी नाहीये. त्याने 2 शतक ठोकली आहेत आणि मला नाही वाटत असं कोणी केलं असेल.


कर्णधाराची तुफान खेळी


तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 83 बॉल्समध्ये त्याचं शतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रोहितने 9 फोर आणि 6 सिक्स लगाववे आहेत. दुसऱ्या बाजूने शुभमन गिलने देखील शतक ठोकलं आहे. गेल्या 4 सामन्यांमध्ये शुभमन गिलचं हे तिसरं शतक आहे. यासह रोहित शर्मा आता वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. रोहित आणि ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंग यांच्या नावावर 30-30 शतकं आहेत.