T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कर्णधार Rohit Sharma टीम इंडियामध्ये करणार `हे` 3 मोठे बदल?
टीम इंडियाला यंदाचा T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 3 मोठे बदल करावे लागतील.
मुंबई : आशिया कपमधून आता टीम इंडिया पूर्णपणे बाहेर पडली आहे. टीम इंडियाचा खेळ या स्पर्धेत फारसा चांगला झाला नाही. यानंतर रोहित शर्मा आणि टीम इंडियासमोर आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. T20 वर्ल्डकप 2022 ला आता जास्त वेळ उरलेला नाही. T20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबर 2022 रोजी पाकिस्तानशी होणार आहे. आशिया कपमधील पराभवानंतर टीम इंडिया आतापासून अॅक्शनमध्ये उतरणार आहे.
टीम इंडियाला यंदाचा T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 3 मोठे बदल करावे लागतील. जाणून घेऊया हे तीन प्रमुख बदल कोणते आहे.
केएल राहुलला बाहेर करणं
टीम इंडियाला 2022 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळावं. केएल राहुलमुळे टीम इंडियाची फलंदाजी आशिया कपमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरली. केएल राहुलच्या सुरुवातीच्या फ्लॉपमुळे संपूर्ण दडपण टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर आहे. अशा परिस्थितीत 2022 च्या T20 विश्वचषकासाठी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळून संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून संधी द्यायला हवी.
ऋषभ पंतला विश्रांती द्यावी
भारताला यंदाचा टी-20 वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर ऋषभ पंतला वगळण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागेल. टी-20 वर्ल्डकपमध्ये ऋषभ पंतला टीम इंडियातून वगळून दिनेश कार्तिकला संधी देणं अधिक योग्य ठरेल. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये ऋषभ पंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे, पण टी-20 क्रिकेटमध्ये तो दिनेश कार्तिकसारखा प्रभावी खेळाडू म्हणून दिसला नाही. दिनेश कार्तिक खूप चांगला फिनिशर आहे. आशिया कपच्या सलग 2 सामन्यांसाठी त्याला विश्रांती दिल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं.
भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता
भुवनेश्वर कुमारबद्दल बोललो तर तो 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी योग्य दिसत नाही. श्रीलंकेच्या डावातील 19व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने भारताचा पराभव 14 रन्सवर निश्चित केला होता. त्यानंतर आता टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणं अशक्य वाटतंय. टीम इंडियाला 2022 चा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर भुवनेश्वर कुमारला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढावं लागेल. भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संधी देणं हा चांगला निर्णय ठरू शकतो.