लंडन : रोहित शर्माच्या शतकासह इंग्लंडच्या नावावर एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या मैदानावर रोहित शर्माचे शतक हे १००० वे शतक ठरले आहे.
 
या शतकासह रोहित शर्मा याने मॅन ऑफ द मॅचवर नाव कोरले तसेच याच शतकाच्या जोरावर त्याने इंग्लंडच्या मैदानाचा विक्रम पूर्ण करण्यात भर टाकली आहे.  या सामन्यात रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ वे शतक केले आहे.


 
इंग्लंड हा पहिला देश आहे, जेथे १००० आंतरराष्ट्रीय शतके झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे जेथे एकूण ९९४ आंतरराष्ट्रीय शतक आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे तिथे एकूण ७०१ शतक आहेत.
यानंतर वेस्ट इंडिजमध्ये ५८७, दक्षिण आफ्रिकामध्ये ५१५, न्यूझीलंडमध्ये ४५०, पाकिस्तानमध्ये ३७१, श्रीलंकामध्ये ३४७, बांगलादेशमध्ये १८८, युएईमध्ये १८४, तर झिम्बाब्वेमध्ये १७९ शतक झाले आहेत.