Rohit Sharma : बॉर्डर-गावस्कर सिरीजमधील (Border Gavaskar Trophy) शेवटचा सामना अहमदाबादच्या स्टेडियममध्ये खेळवला जातोय. हा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (ICC World Test Championship) फायनल गाठण्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. यावेळी फिल्डींग करत असलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वॉटर बॉयसोबत मस्ती करताना दिसला. हा वॉटर बॉय दुसरा तिसरा कोणीही नसून ईशान किशन होता. दरम्यान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


Rohit Sharma ची इशान किशनसोबत मस्ती


टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मस्तीच्या मूडमध्ये अनेकदा मैदानात सहकारी खेळाडूंना फटकार लगावताना दिसतो. याचीच प्रचिती आज पुन्हा आली. रोहित शर्माची ईशान किशनसोबतची मजा-मस्करी यावेळी कॅमेरात कैद झाली आहे. 


ऑस्ट्रेलिया टीम फलंदाजी करत असताना ईशान किशन ओव्हर संपल्यानंतर मैदानात आला. डिंक्स ब्रेक असल्याने तो सहकारी खेळाडूंसाठी पाणी घेऊन आला. सर्व पाण्याच्या बॉट घेऊन तो पुन्हा डगआऊटमध्ये जात असताना हिटमॅनने आपली बॉटल देखील त्याला दिली. यावेळी ईशान इतक्या वेगात होता की, घाईघाईत बॉटल जमिनीवर पडली. 



हे दृश्य पाहताच रोहित शर्माला मस्करी सुचली. त्याने मस्करीत, चल भाग इधर से... असं म्हणून त्याला मस्करीत मारण्यासाठी हात उगारला. हे पाहून जडेजा देखील हसू रोखू शकला नाही. मात्र यावेळी रोहितचा हा व्हिडीओ काही चाहत्यांना आवडला नसून, ते याला रोहित शर्माचा उद्धटपणा म्हणतायत.


रोहित शर्माने घेतले हे मोठे निर्णय


अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या या टेस्ट सामन्यात मोठे निर्णय घेत रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मा शुभमन गिलसह टीम इंडियासाठी ओपनिंग करताना दिसणार आहे आहे. चौथ्या टेस्टमधून पुन्हा एकदा के.एल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी फायदेशीर ठरल्याचंही दिसून आलं.