Rohit Sharma On captaincy: आयपीएलमध्ये (IPL) सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स मानली जाते. सोबतच या टीमचा कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव देखील आयपीएलच्या यशस्वी कर्णधारांमध्ये घेतलं जातं. दरम्यान रोहित शर्माने त्याला कर्णधारपद कसं मिळालं याबाबत खुलासा केला आहे. आयपीएलपूर्वी झालेल्या एका शो दरम्यान रोहितने याबाबत माहिती दिली होती. यावेळी सामन्यापूर्वीच्या रात्री फोन आला आणि मला कर्णधारपद देण्यात आलं, असं रोहितने सांगितंलय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL ऑन स्टार्स यामध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, "2013 साली आमचे एकूण 6 सामने खेळून झाले होते. यामधील 3 सामने आम्ही जिंकलो होतो, तर 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. सातवा सामना आम्ही खेळणार होतो आणि त्या सामन्यापूर्वीच्या रात्री मला अनिल कुंबळेंचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही निर्णय घेतलाय आणि उद्याच्या सामन्यात तू कर्णधार असशील."



यानंतर सकाळी अनेक बदल झाले. नॉर्मल रूममधून मला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळी मला समजलं की, नाही खरंच मला कर्णधार बनवण्यात आलंय. यानंतर मी अनिल कुंबळे आणि इतर सपोर्ट स्टाफना भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी मला स्वतःहून विचारलं की, तुला कशी टीम हवी आहे. सहसा असं होताना दिसत नाही. तेव्हा मला कळलं की केवळ नावासाठी मला कर्णधार बनवण्यात आलेलं नाही. माझ्या मताचाही विचार केला गेला, असाही खुलासा रोहित शर्माने केला आहे. 


कर्णधार रोहित शर्माच्या सांगण्यानुसार, रिकी पॉन्टिंगच्या निर्णयानंतर ते खेळणार नव्हते. त्यामुळे आम्ही टीममध्ये काहीसे बदल केले. यानंतर कोलकात्यात झालेला तो सामना आम्ही जिंकला.


2013 साली मिळाली रोहितला कॅप्टन्सी


2013 मध्ये अनिल कुंबळे मुंबई इंडियन्सचे मेंटर होते. यापूर्वी ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 3 वर्षे खेळला होता. त्यावेळी जॉन राइट हे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते. अशामध्ये 6 सामने खेळून झाल्यानंतर त्यांनी रोहित शर्माला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता.