Rohit Sharma: यंदाच्या आयपीएलला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्सची सुरुवात यावेळी काही फारशी चांगली झालेली दिसत नाहीये. मुंबईचे तीन सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या सिझनपूर्वी मुंबईच्या टीममध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून आलं. या काळात रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र हार्दिकच्या कॅप्टन्सीखाली टीमला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रोहितच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवणार का, असा प्रश्न निर्माण होत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. या पराभवानंतर हार्दिक पंड्या याच्या कर्णधारपदावर नाराजी व्यक्त केली जातेय. मुंबईच्या सलग 3 पराभवामुळे टीम मॅनेजमेंचने हार्दिकला कर्णधारपद देण्यावर प्रश्न उपस्थित केलं. अशातच आता नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालीये. 


रोहित शर्मा पुन्हा स्विकारणार का कर्णधारपद?


मिळालेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांनी रोहित शर्मा याला ऑफर दिल्याचं समजतंय. मात्र ही ऑफर रोहितने स्पष्टपणे नाकारली आहे. इतकंच नाही तर यंदाचा आयपीएलचा सिझन संपल्यावर मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये रोहित शर्मा नव्या टीमकडून खेळण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.



रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडण्याची शक्यता


एका अहवालानुसार, रोहित शर्मा सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सिझननंतर MI फ्रँचायझी सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर रोहित अजिबात खूश नसल्याचं म्हटलं जातंय. हार्दिक पंड्याच्या कॅप्टन्सीखाली रोहित शर्मा नाखूश असल्याचं समजलं. त्यामुळे पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्मा टीमबाहेर होण्याची शक्यता आहे.