Rohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं...; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक दृष्य असतात, ज्यामुळे आपण हसू रोखू शकत नाही. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये देखील अशीच एक घटना घडली
Rohit Sharma : भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टॉस हरला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने (Australia Team) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया टीमचा 263 रन्सवर ऑलआऊट देखील झाला. दरम्यान आजच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मजेशीर कृत्य करताना दिसून आला. या सामन्यामध्ये एकवेळ अशी आली होती, जेव्हा रोहित शर्माची पँट खाली आली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला.
Rohit Sharma वर ही काय वेळ आली?
क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक दृष्य असतात, ज्यामुळे आपण हसू रोखू शकत नाही. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये देखील अशीच एक घटना घडली, ज्यामुळे तुम्हीही हसू लागाल. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधारासोबत नको ती घटना घडली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, फिल्डींगच्या वेळी रोहित शर्माची पँट खाली आलेली दिसली. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज रोहित शर्मा जवळ गेला. यानंतर रोहितने स्वतःची पँट नीट केली. दरम्यान रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र जोरात व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलिया टीमचा पहिल्याच दिवशी ऑल आऊट
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये देखील कांगारू फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या. 263 रन्सवर ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडूंना पव्हेलियनमध्ये पाठवलं. यावेळी मोहम्मद शमीने कहर करत 4 विकेट्स पटकावले. तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3-3 विकेट्स काढले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकाँब यांनी चांगली फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुस्चगने, स्टीवन स्मिथ, ट्रॅविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स केरी, पॅट कमिंस (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियोन, मॅथ्यू कुह्नमॅन.
टीम इंडिया प्लेइंग 11
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.