रोहित शर्माचा फ्लॉप शो! मुंबई टीमला मिळाला नवा कर्णधार, 2 नावं आघाडीवर
कॅप्टन म्हणून रोहित शर्मा सलग दुसऱ्यांदा फ्लॉप ठरला! मुंबई टीमसाठी नव्या कर्णधाराचा शोध सुरू
मुंबई : मुंबई टीमची कामगिरी अत्यंत वाईट आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईची कामगिरी खास नव्हती. त्यामुळे प्लेऑफमधून बाहेर झाली. 12 सामन्यात मुंबई 9 सामने हरले आहेत. केवळ 3 सामने जिंकण्यात यश आलं. रोहित शर्मा फ्लॉप ठरत असल्याने आता कर्णधारपद दुसऱ्याकडे सोपवण्यावर चर्चा सुरू आहे.
2021 च्या आयपीएलमध्ये आणि 2022 च्या हंगामात मुंबईची अत्यंत वाईट कामगिरी पाहायला मिळाली. रोहित शर्मा कर्णधार म्हणून अपयशी ठरला. त्यानंतर कर्णधारपद सोडण्यावर दबाव आला आहे. आता कर्णधारपदासाठी 2 खेळाडूंची नाव चर्चेत आहेत.
1. जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह मुंबईचा नवा कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे. पुढचा दावेदार जसप्रीत बुमराह आहे. त्याला आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव आहे. त्याचा फायदा मुंबई टीमला होऊ शकतो. बुमरहाने टीम इंडियाचं उपकर्णधारपदही भूषवलं आहे. त्यामुळे मुंबई टीम त्याचा कर्णधारपदासाठी विचार करू शकते. बुमराहने आयपीएलमध्ये 118 सामन्यात 141 विकेट्स घेतल्या आहेत.
2. सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार असू शकतो. 123 सामन्यात त्याने 2644 धावा केल्या आहेत. स्फोटक फलंदाजी करण्यात सूर्यकुमार यादव माहीर आहे. 2022 च्या आयपीएलच्या 8 सामन्यात 303 धावा केल्या आहेत.