मुंबई : भारतीय टीमचा वनडे आणि टी20 टीमचा उपकर्णधार रोहित शर्मा बीसीसीआयवर नाराज झालेला दिसतोय. त्याला टेस्ट टीममध्ये जागा न मिळाल्याने तो नाराज आहे. भारत आणि अफगानिस्तान यांच्यात 14 जूनला टेस्ट सामना रंगणार आहे. वनडे आणि टी20 मध्ये महत्त्वाचा मानला जाणार खेळाडू टेस्टमध्ये जागा नाही मिळवू शकला. कर्णधार विराट कोहलीने त्याला अनेकदा संधी दिली पण टेस्टमध्ये तो काही खास करु शकला नाही. याबाबत जेव्हा त्याला विचारण्यात आलं तेव्हा त्याने यावर खूपच वेगळं उत्तर दिलं.


काय बोलला रोहित शर्मा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माने म्हटलं की, 'आता टेस्ट क्रिकेटबाबत विचार करण्याचा वेळ नाही आहे. एका खेळाडूकडे जास्त वेळ नसतो. माझं अर्ध करिअर पुढे निघून आलं आहे आणि आता अर्ध करिअर हा विचार करण्यात नाही घालवणार की मला का निवडण्यात नाही आलं. मला पुढे जायचं आहे. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा त्याचा पूर्ण फायदा घेईल.'


रोहितची जागा अंजिक्यला 


रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅटमध्ये सध्या फ्लॉप ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात विराटने रोहितची जागा अजिंक्य रहाणेला दिली होती. त्यानंतर त्याला रोहितच्या फॅन्सचा विरोध देखील सहन करावा लागला होता. अफगानिस्तान विरोधात होणाऱ्या एकमेव सामन्यात अंजिक्य रहाणे हाच संघाचं नेतृत्व करणार आहे. या टेस्टसाठी विराटला आराम देण्यात आला आहे. करुन नायरचा त्याचा जागी संघात समावेश झाला आहे.