नवी दिल्ली : टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा हा हिटमॅन म्हणून चांगलाच प्रसिद्ध आहे. वनडे सामन्यात तीन दुहेरी शतक लगावणारा तो एकुलता एक खेळाडू आहे. 


रोहित शर्माची बॅट शांत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-२० मध्ये सर्वात वेगवान शतकचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. पण दक्षिण आफ्रिका दौरा त्याच्यासाठी जरा अडचणीचाच ठरला. आत्तापर्यंत आपलं शानदार प्रदर्शन दाखवल्यानंतरही तो दक्षिण आफ्रिकेत मोठा स्कोर उभा करू शकला नाहीये. दक्षिण आफ्रिके विरूद्ध सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या दुस-या टी-२० मध्ये तो पुन्हा एकदा एकही रन न काढता आऊट झाला. 


काय आहे रेकॉर्ड?


रोहित शर्माला दक्षिण आफ्रिकी गोलंदाज ज्यूनिअर डालाने पहिल्या बॉलवर एलबीडब्ल्यू केलं. यामुळे अर्थातच रोहित आणि त्याचे चाहते निराश झाले. यासोबतच रोहितच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड झाला. कोणत्याही खेळाडूला असा रेकॉर्ड आपल्या नावावर करायला आवडणार नाही. 


याआधीही काहींच्या नावावर होता रेकॉर्ड


सेंच्युरियनमध्ये आऊट झाल्यावर रोहित क्रिकेटसोबत या सर्वात लहान फॉर्मॅटमध्ये सर्वात जास्त वेळा शून्यवर आऊट होण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. रोहित शर्मा सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या दुस-या टी-२० सामन्यात चौथ्यांदा डक आऊट झालाय. टीम इंडियाचा माजी खेळाडू आशिष नेहरा आणि ऑल राऊंडर युसूफ पठाण टी-२० क्रिकेटमध्ये ३-३ वेळी शून्यावर आऊट झालाय. रोहित शर्माच्या करिअरचं हे सर्वात अनोखं रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड करण्याचं करण्याचा त्याला नक्कीच पश्चाताप होईल. 


रोहित शर्मा - आत्तापर्यंत ४ वेळा
यूसुफ पठाण - ३ वेळा
आशिष नेहरा - ३ वेळा


रोहित शर्माला त्याच्या या रेकॉर्डमुळे सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. 







अर्थातच टीम इंडियासाठी दक्षिण आफ्रिका दौरा यादगार आणि ऎतिहासिक रहिलाय. भारताने वनडे सीरिज ५-१ ने जिंकली. पण पूर्ण सीरिजमध्ये रोहित शर्माची बॅट शांतच राहिली. रोहितने दक्षिण आफ्रिका दौ-यात केवळ एकच शतक केलं.