रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? म्हणाला `तुम्ही मला...`
Rohit Sharma Retirement : टी20 वर्ल्डकप भारताने जिंकल्यानंतर रोहित शर्माने या फॉरमॅटला अलविदा केलंय. आता हिटमॅनने वनडे, कसोटीतूनही निवृत्तीबद्दल अपडेट दिलीय.
Rohit Sharma Retirement : टी-20 वर्ल्ड कपवर (T-20 World Cup) भारताने आपल नाव कोरल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच वय लक्षात घेता तो 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करेल अशी चर्चा रंगली होती. मात्र हिटमॅनने त्याचा निवृत्तीबद्दल मोठा खुलासा केलाय.
महत्त्वाच म्हजणे काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी टीम इंडिया केवळ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल, असं घोषत केलंय. मात्र, जय शाहने 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपबद्दल मात्र काही स्पष्ट सांगितलं नाही. अशा परिस्थितीत हिटमॅन 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतच वनडे फॉरमॅट खेळेल, अशी अटकळ क्रिकेटप्रेमींकडून अशी तर्क लावले जात आहेत. पण आता खुद्द रोहितनेच हे सर्व संभ्रम दूर करुन सर्व फॉरमॅटबद्दल स्पष्ट सांगितलंय.
14 जुलैला डॅलसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात, जेव्हा रोहित शर्माला एकदिवसीय आणि कसोटीतून निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हिटमॅनने सांगितले की, 'तो खूप पुढचा विचार करत नाही, मात्र सध्या चाहते त्याला खूप खेळताना पाहतील. त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे' असेही यावेळी म्हणाला. मग काय रोहितच्या या उत्तरानंतर कार्यक्रमाला उपस्थित चाहत्यांनी एकच टाळ्या वाजून जल्लोष केला.
2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने रोहित शर्माला कर्णधार बनवले होतं. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2022 च्या T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. मात्र, हिटमॅनने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवले. भारताने 13 वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावले. टीम इंडियाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला.