Rohit Sharma Retirement : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल ( ICC World Test Championship ) सामन्यामध्ये टीम इंडियाला ( Team India ) पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह टीम इंडियाचं आयसीसी ( ICC ) जिंकण्याचं स्वप्न देखील भंगलंय. ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) टीकेची झोड उठवली जातेय. अशातच रोहित शर्माने ( Rohit Sharma ) निवृत्ती घेतल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला ( Team India ) पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नव्हे. यापूर्वीही 2021 मध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला पराभव स्विकारावा लागला होता. दरम्यान यंदाच्या  WTC 2023 फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यावर असा दावा केला जातोय की, रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टेस्टमधून निवृत्ती घेतली आहे.


एका ट्विटमुळे खळबळ


सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय ज्यामध्ये भारताच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये एक भावूक नोट ट्विट करण्यात आली आहे. ज्यामध्ये रोहितने ( Rohit Sharma ) टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेण्याचं म्हटलंय. 


दरम्यान याबाबत पडताळणी केली असता रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट केलं नसल्याचं समोर आलंय. दरम्यान निवृत्तीची पोस्ट करण्यात आलेल्या ट्विटरचं @ImRohitt45 हे हँडल आहे. तर रोहित शर्माचं अधिकृत ट्विटर हँडल @ImRo45 आहे. याचाच अर्थ रोहितने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. 



WTC 2023 फायनलमध्ये भारताचा पराभव


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 रन्सने पराभव केला. यावेळी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या टीमला 173 रन्सची मजबूत आघाडी मिळाली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने दुसऱ्या डावामधये 270 रन्स करत टीम इंडियाला जिंकण्यासाठी 443 रन्सचं टार्गेट दिलं होतं. 


या आव्हानाचा सामना करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजांना सामना खेचून घेऊन जाता आला नाही. शुभमन गिलने देखील दुसऱ्या डावात निराशाजनक कामगिरी केली. पाचव्या दिवशी कांगारूंना सामना जिंकण्यासाठी 7 विकेट्सची गरज होती. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या 2 तासांमध्ये टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना माघारी धाडलं.