Rohit Sharma and Cheteshwar Pujara: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगल्या फॉर्ममध्ये असून उत्तम फलंदाजी करत होता. त्याने 20 बॉल्समध्ये 31 रन्सची खेळी केली होती. रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत असतानाच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि त्याच्यामध्ये काहीशी गफलत झाली आणि टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) कर्णधाराने आपली विकेट गमवाली. पुजाराची ही 100 वी टेस्ट मॅच होती, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी रोहितने स्वतःची विकेट गमवाणं योग्य समजलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा दुसरा अवघ्या 113 रन्समध्ये गडगडला. एकट्या रविंद्र जडेजाने केवळ 42 रन्स देऊन 7 विकेट्स पटकावल्या. पहिल्या डावामध्ये जडेजाने 3 विकेट्स घेतल्या होत्या, दुसऱ्या टेस्ट सामन्यात जडेजाने एकूण 10 विकेट्स काढल्या आहेत. 


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना टीमची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाच्या केवळ 6 रन्सच्या स्कोरवर केएल राहुलच्या रूपात पहिला झटका लागला. राहुल केवळ एका रनवर पव्हेलियनमध्ये परतला. पहिली विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा आणि पुजारा यांनी डाव सांभाळला. 


आजच्या सामन्यात टीम इंडिया दुसऱ्यांदा फलंदाजी करत असताना रोहित शर्मा चांगलाच आक्रामक दिसून आला. त्याने 20 बॉल्समध्ये 31 रन्स केले. यामध्ये 3 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. 


दुसऱ्या रनच्या नादात रोहितने गमावली विकेट


डावाच्या सातव्या ओव्हरमध्ये 2 रन्स घेण्याच्या नादात रोहित शर्माने त्याची विकेट गमावली. पुजारा आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये रन घेण्याच्या कॉलवरून दोघांमध्ये गफलत झाली आणि रोहित रन आऊट झाला. झालं असं की, रोहित शर्मा फिल्डरला पाहून त्याच्या क्रीजमध्ये परतला होता, मात्र तोपर्यंत पुजारा रोहितपर्यंत पोहोचला होता. यावेळी रोहित पुजाराला वाचवण्यासाठी स्वतः क्रीजबाहेर आला आणि विकेट गमावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.



तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलिया वर टीम इंडियाचा दणदणीत विजय..


भारत आणि ऑस्ट्रेलिया (ind vs aus 2nd test) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 263 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी हाफ सेंच्युरी झळकावली. तर टीम इंडियाच्या वतीने शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले.


अश्विन-जडेजाची दमदार गोलंदाजी


ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 264 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 262 वर आटोपला गेला. विराट कोहलीने  44 धावा केल्या तर  अक्षर पटेलने  74 धावा करत भारताला सावरलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 1 रनची लीड घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात रविंद्र जडेजा आणि आश्विने सटीक मारा करत 10 विकेट काढल्या. त्यात जडेजाच्या 7 तर आश्विनच्या 3 होत्या.