रोहित शर्माच्या शतकानंतर भारताला धक्के
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं आहे.
पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं आहे. वनडे क्रिकेटमधलं रोहितचं हे १७वं तर दक्षिण आफ्रिकेतलं पहिलं शतक आहे. दक्षिण आफ्रिकेतली रोहितची याआधीची कामगिरी फारशी चांगली नव्हती. या मॅचआधी रोहितचा दक्षिण आफ्रिकेतला सर्वाधिक स्कोअर २३ रन्स होता. १२६ बॉल्समध्ये ११५ रन्स करून रोहित शर्मा आऊट झाला. तर रोहितपाठोपाठ आलेला हार्दिक पांड्या पहिल्याच बॉलला आऊट झाला आङे.
रोहितच्या शतकाबरोबरच भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. भारताचा स्कोअर २०० रन्सच्या पुढे गेला असून ५ विकेट गेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये शतक झळकवाणारा शिखर धवन २३ बॉल्समध्ये ३४ रन्स करून आऊट झाला. तर विराट कोहली ३६ रन्सवर रन आऊट झाला. त्यानंतर बॅटिंगला आलेला अजिंक्य रहाणेही ८ रन्सवर रन आऊट झाला.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा
तिसऱ्या वनडेमध्ये शून्य रनवर आऊट झालेला रोहित चौथ्या वनडेमध्ये ५ रन्सवर आऊट झाला होता. चौथ्या मॅचमध्ये कागिसो रबाडानं रोहित शर्माला आऊट केलं. या सीरिजमध्ये रबाडानं रोहितची तिसऱ्यांदा विकेट घेतली. तर एका मॅचमध्ये मॉर्नी मॉर्कलनं रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
वनडे कारकिर्दीमध्ये रोहित शर्मा १२ वेळा शून्यवर आऊट झाला आहे. याआधी ज्या ११ मॅचमध्ये तो शून्यवर आऊट झाला त्यापैकी ५ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला. एका मॅचचा निकाल लागला नाही.
रोहितनं मागच्या ११ इनिंगमध्ये ११.४५च्या सरासरीनं १२६ रन्स बनवले आहेत. या ११ इनिंगमध्ये रोहितचा स्कोअर ११, ९, २३, १, ५, १८, १९, २०, १५, ०, ५ असा आहे.