कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही शतक झळकावलं आहे. वनडे क्रिकेटमधलं रोहितचं हे तेरावं शतक आहे. रोहित शर्माचं हे लागोपाठ दुसरं शतक आहे. ८५ बॉल्समध्येच रोहितनं त्याचं शतक पूर्ण केलं. ८८ बॉल्समध्ये १०४ धावा करून रोहित शर्मा आऊट झाला. रोहितच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि रोहितच्या शतकामुळे भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. ३४ ओव्हरमध्येच भारताचा स्कोअर २६०च्या पुढे गेला आहे. रोहित शर्माच्या आधी विराटनं वनडे क्रिकेटमधलं २९वं शतक केलं. विराटनं ७७ बॉल्समध्येच त्याचं शतक पूर्ण केलं. ९६ बॉल्समध्ये १३१ धावा केल्या, यामध्ये १७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा 


वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडेमध्ये सचिनची ४९, पॉटिंगची ३० शतकं आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या २८ शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडला आहे.
 
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन फक्त ४ रन्सवर आऊट झाला.


या मॅचमध्ये भारतीय टीममधून केदार जाधव, भुवनेश्वर कुमार आणि युझुवेंद्र चहालला वगळण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी मनिष पांडे, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.